घरक्रीडाT20 world cup 2021: IND VS SCO भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा...

T20 world cup 2021: IND VS SCO भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा कायम; स्कॉटलँडला नमवत ८ गडी राखून मोठा विजय

Subscribe

टी-२० विश्वचषकातील सुपर १२ साठी झालेल्या लढतीत स्कॉटलँडचा ८ गडी आणि ८१ चेंडू राखून पराभव केला

भारतीय गोलंदाजांची अचूक गोलंदाजी आणि सलामीवीर के.एल राहुलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारताने टी-२० विश्वचषकातील सुपर १२ साठी झालेल्या लढतीत स्कॉटलँडचा ८ गडी आणि ८१ चेंडू राखून पराभव केला. भारताने गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या ८५ धावावंर गुडांळले होते. भारतीय संघाला उपांत्य फेरीत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना करो या मरो असा होता. भारतातर्फे प्रथम गोलंदाजी करताना संघाकडून सांघिक खेळी पहायला मिळाली. भारताकडून फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेऊन सामन्यात भारतीय संघाची पकड मजबूत केली.

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर स्कॉटलँडचे फलंजाद पूर्णत: चितपट झाले. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी ३-३ बळी पटकावले. तर बुमराहच्या खात्यात २ बळींची नोंद झाली तर फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनला १ बळी घेण्यात यश आले.

- Advertisement -

तर स्कॉटलँडकडून निराशाजनक फलंदाजी झाली. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर कोणत्याच स्कॉटलँडच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. संघातर्फे मिचेल लीस्कने सर्वाधिक २१ धावा केल्या. तर तीन फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही.

भारताय संघाला आजचा सामना करो या मरोचा असा होता. भारतीय संघाने शुक्रवारच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. भारताने विजयासह ग्रुप बी च्या क्रमवारीत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. तर स्कॉटलँडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -