घरमहाराष्ट्रनागपूरSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार; आता थेट गोंदिया टू मुंबई

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार; आता थेट गोंदिया टू मुंबई

Subscribe

महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर यांना जोडणारा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र संकल्पनेतून साकार झालेला अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पूर्ण झाला.

मुंबई : महायुती सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाचा विस्तार वाढणार आहे. परंतु तो परतमार्गी असणार आहे. कारण, पूर्वी नागपूर ते मुंबई असा प्रस्तावित असलेला समृद्धी महामार्ग उलट मार्गे नागपूरपासून कोसो दूर असलेल्या जिल्ह्यांना जोडल्या जाणार आहे. यामध्ये भंडारा ते गडचिरोली, नागपूर ते चंद्रपूर आणि नागपूर ते गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. ही माहिती महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर देण्यात आली आहे. (Samruddhi Mahamarg Samruddhi Highway to be expanded Now direct Gondia to Mumbai)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर यांना जोडणारा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र संकल्पनेतून साकार झालेला अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पूर्ण झाला. यंदाच्या दिवाळीत तर, त्यावरून विक्रमी वाहतूक झाली. याच महत्त्वकांक्षी महामार्गाचा पुढचा टप्पा म्हणजे, याच्या विस्ताराला मान्यता मिळाली आहे. आता हा महामार्ग नागपूर पासून पुढे गोंदियापर्यंत विस्तारला जाणार आहे. राज्याची पूर्व व पश्चिम सीमा या निमित्ताने एकसंधपणे जोडली जाणार आहे अशी पोस्ट महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर केली आहे.

- Advertisement -

असा होणार समृद्धी महामार्गाचा विस्तार

भंडारा ते गडचिरोली – 142 किलो मीटर

- Advertisement -

नागपूर ते चंद्रपूर – 194 किलो मीटर

नागपूर ते गोंदिया – 162 किलो मीटर

हेही वाचा : Pune Accident News : कात्रजच्या नवीन बोगद्यात 5 वाहनांचा विचित्र अपघात; गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

गौण खनिजाची खाण म्हणजे पूर्व विदर्भ

कोळसा, चूनखडी, मॅगनीज, लोहखनिज आदी गौण खनिज हे पूर्व विदर्भातील जिल्ह्यातच आढळतात. एका सर्वेक्षणानुसार 6 हजार 956 दशलक्ष टन खनिजांचे साठे विदर्भात आहेत. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हे मोठे साठे आहेत. तेव्हा या गौण खनिजांची वाहतूक ही रस्ता मार्गे आणि तीसुद्धा गतीने नव्हे जलद गतीने होणार असल्याने या समृद्धी महामार्गाची विस्तारीकरण करण्यात येत असल्याची चर्चा सध्या यानिमित्ताने रंगत आहेत.

हेही वाचा : Shirsat On Raj Thackeray : राज ठाकरेंनाही महायुतीत घ्या; शिरसाटांनी सांगितलं नेमकं कारण

हा आहे विस्तारीकरणाचा उद्देश

समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणामागील कारणामध्ये नागपूर शहरास मागे गडचिरोली, भंडारा आणि पुढे मुंबईशी प्रवेश नियंत्रित दुतगती महामार्गाने जोडणे एका पहिला उद्देश असून, राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमांना द्रुतगती महामार्गाने जोडणे, देशाच्या उत्तर आणि ईशान्येकडील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांशी आंतरराज्यीय संपर्क स्थापित करणे, आंतरराज्यीय प्रवासी आणि माल वाहतूकीमुळे समृद्धी महामार्गाची व्यवहार्यता सुधारण्यासाठी मदत होईल सोबतच पूर्व महाराष्ट्रातील अल्प विकसित जिल्ह्यांचा सामाजिक- आर्थिक विकास होण्यास मदत होणार असल्याचाही उल्लेख विस्तारीकरणाच्या कामाबाबत काढण्यात आलेल्या आदेश नमुद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -