घरताज्या घडामोडीSAVE INS विक्रांतअंतर्गत पैसे गोळा करण्यासाठी ७११ मोठे बॉक्स वापरले, राऊतांचा सोमय्यांवर...

SAVE INS विक्रांतअंतर्गत पैसे गोळा करण्यासाठी ७११ मोठे बॉक्स वापरले, राऊतांचा सोमय्यांवर आरोप

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतसाठी सेव्ह आयएनएस विक्रांत अशी मोहिम राबवली होती. या अंतर्गत महाराष्ट्रात पैसे गोळा करण्यात आले होते. हा पैसा गोळा करण्यासाठी सोमय्यांनी ७११ मोठे बॉक्स वापरले होते. तसेच हे बॉक्स त्यांच्या मुलूंडच्या कार्यालयात आणि मुंबईतील बिल्डर मित्रांच्या कार्यालयात ठेवला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या कार्यालयातून हा पैसा पीएमसी बँकेच्या माध्यमातून चलनात आणला आहे. पीएमसी बँकेचा वापर करुन सोमय्यांनी काळा पैसा व्हाईट केला असा आरोप संजय राऊतांनी सोमय्यांवर केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पैशांचा अपहार कसा केला याबाबत खुलासा केला आहे. भ्रष्टाचाराची व्याप्ती देशभरात आहेत. सेव्ह विक्रांतच्या नावाखाली देशात पैसे गोळा केले आहेत. विक्रांतसाठी २०० कोटी हवे होते त्यापेक्षा जास्त पैसे गोळा केले आहेत. यातील पैसे सोमय्यांनी निवडणुकीसाठी वापरले आहेत. तर बरेचसे पैसे सोमय्यांनी पीएमसी बँकेच्या माध्यमातून व्हाईट केले आहेत. काळा पैसा पीएमसी बँकेच्या माध्यमातून चलनात आणले आणि नील सोमय्यांच्या कंपनीत वापरले. मोठे बॉक्स पैसे गोळा करण्यासाठी तयार करण्यात आले होते. त्यांच्या जवळच्या माणसाने दिलेल्या माहितीनुसार ७११ मोठे बॉक्स वापरण्यात आले होते. हे सगळे बॉक्स मुलूंडच्या नीलम नगरमध्ये ठेवण्यात आले होते. असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

सोमय्यांनी पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसा चलनात आणला

जमा केलेल्या पैशांचे बंडल बांधण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना बोलवलं होते. ते पैसे पीएमसी बँकेच्या माध्यमातून वळवण्यात आले तर काही बॉक्स जुहूतील किरीट सोमय्यांचे बिल्डर मित्र त्यांच्याकडे ठेवण्यात आले. त्या माध्यमातून पैशाचा व्यवहार झाला आहे. हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा असू शकतो. यामध्ये पीएमएलए कायदा लागू शकतो जर ईडी भाजपची बटीक नसेल तर हा ईडीचा कायदा आहे. त्यानुसार कारवाई होऊ शकते. काल मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.

आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेनेकडून स्थगन प्रस्ताव

शिवसेना खासदार संजय राऊत यांना स्थगन प्रस्तावाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, हा मुद्दा देशभरात गाजणार, शिवसेनेकडून राज्यसभेत, लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात या भ्रष्टाचाऱ्याविरोधात आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्त बसणार नाही हे देशद्रोही लोक आहेत त्यांना तुरुंगात टाकू, देशभक्तीचे मुखवटे लावून, हिंदुत्वाचे खोटे मुखवटे लावून तुम्ही लोकांना मुर्ख बनवण्याचे उद्योग चालवले आहेत. आता हे मुखवटे गळून पडले आहेत. हे लहान विषय त्यांच्या दृष्टीने आहेत परंतु लवकरच मोठी प्रकरण बाहेर आणणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : माझे शब्द लक्षात लिहून घ्या, सोमय्या देशद्रोही, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, राऊतांचा पुन्हा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -