घरमहाराष्ट्रफोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न आता गोव्यात

फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न आता गोव्यात

Subscribe

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जशी जवळ येत आहे, तसे फोन टॅपिंगचे प्रकार आता गोव्यातही सुरू झाले आहेत. फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न आता गोव्यातही सुरू झाला आहे. महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच गोव्याच्या पॅटर्नचेही प्रमुख आहेत, अशी गंभीर टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे. १० मार्चनंतर केंद्रीय तपास यंत्रणा या सक्रीय होतील. माझा फोन केंद्रीय तपास यंत्रणा आताही टॅप करत आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी स्थापन होत असताना झालेल्या फोन टॅपिंगच्या प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशन, पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या हालचाली सुरू झाल्या, त्यामध्ये आमचे फोन टॅप झाले. आम्ही कोणाशी बोलतोय, कुणाला भेटतोय, काय बोलतोय ही सगळी माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कोणाला देत होत्या हे सगळ्यांना माहीत आहे. अशा प्रकारचे पॅटर्न आता अशा राज्यातही राबवले जात आहे, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले. त्यांनी भीती व्यक्त केली की आमचे फोन टॅप होत आहेत. त्यांनी गोव्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि फोन टॅप होत असल्याची माहिती दिली. त्यांना मी माहिती दिली की, सुधीर ढवळीकर, विजय सरदेसाई हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांचेही फोन टॅपिंग होत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, आम्ही सगळे काळजी घेत आहोत, असा सल्ला मी त्यांना दिला, असेही राऊत यांनी म्हटले. केंद्रीय तपास यंत्रणा १० मार्चनंतर गोव्यात सक्रिय होतील. गेल्या काही दिवसांपासून म्हणूनच भाजपने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी प्रयत्न केला, आता गोव्यातही असाच प्रयत्न सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

राज्यपाल भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत
या देशात लोकशाही धोक्यात आली आहे ती घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय व्यक्तींमुळे. राज्यपाल हटवले पाहिजे, हे सरकारचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे म्हणणे आहे. राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासारखे काम करत आहेत. हे राज्याला देशाला घटनात्मक पदाला शोभणारे नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -