घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटलांना राऊतांकडून सव्वा रुपयांची मानहानीची नोटीस, PMC घोटाळ्याचा केला होता आरोप

चंद्रकांत पाटलांना राऊतांकडून सव्वा रुपयांची मानहानीची नोटीस, PMC घोटाळ्याचा केला होता आरोप

Subscribe

संजय राऊत यांनी सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अखेर मानहानीची नोटीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बजावण्यात आली आहे. चंद्रकात पाटील यांनी संजय राऊतांवर पीएमसी बँक घोटाळ्याबाबत आरोप केले होते. याबाबत सव्वा रुपया अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते त्यानुसार राऊतांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. संजय राऊतांनी मानहानीच्या दाव्याची रक्कम वाढवावी असे देखील चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते. या नोटीसवर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर जळजळीत टीका केली होती या टीकेला उत्तर देताना पाटलांनी राऊतांच्या पीएमसी घोटाळ्याबाबतचे वक्तव्य केलं होते यावरुन राऊतांनी सव्वा रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सव्वा रुपये अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून ही नोटीस देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर आरोप केले होते. यामुळे संजय राऊत यांनी सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार संजय राऊतांकडून अखेर पाटील यांना नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरुन भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरातुन पळ काढावा लागला आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवताना तोंडाला फेस आला होता असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर पलटवार करताना पीएमसी बँकच्या घोटाळ्याबाबत आठवण करुन देत संजय राऊतांच्या लाख रुपयांसाठी तोंडाला फेस आला होता तर करोडो रुपयांसाठी काय अवस्था होईल याचा विचारच करायला नको असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होते. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना आपण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाची नोटीस बजावणार असल्याचे सांगितले होते. यांची जेवढी लायकी तेवढाच दावा लावायचा असं संजय राऊत यांनी म्हटंल होते.

- Advertisement -

रक्कम वाढवण्याची पाटलांकडून विनंती

राऊतांच्या नोटीसवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटलांना राऊतांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत प्रश्न केला. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, हरकत नाही, कोणी १०० कोटी, कोणी १५० कोटी तर हे सव्वा रुपया फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवेल की, थोडी रक्कम वाढवावी लागेल याचे कारण म्हणजे शेवटी अब्रुनुकसानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती एवढ्या कोटीची आहे. संजय राऊतांची अब्रुनुकसानी एवढ्या रुपयांची नाही आहे. त्यामुळे त्यांनी थोडी रक्कम वाढवावी असा चिमटा चंद्रकांत पाटील यांना काढला होता. परंतु आता चंद्रकांत पाटील या नोटीसवर काय बोलणार याकडे साऱ्यांचे लागले आहे.


हेही वाचा :  ‘रेल्वे, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खासगीकरणाचा घाट’; शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -