घरदेश-विदेशसंजय राऊत यांनी घेतली शेतकरी नेते टिकैत यांची भेट

संजय राऊत यांनी घेतली शेतकरी नेते टिकैत यांची भेट

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेतली. शिवसेना नेत्यांनी गाझीपूर सीमेवरून जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी बातचीत केली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी टिकैत यांना सांगितले. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनावरून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. सोमवारी शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने गाझीपूरमध्ये जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेतली.

‘आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी शेतकर्‍यांसोबत उभे आहोत. सरकारने त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकर्‍यांचा विषय आहे. चर्चेत कोणतेही राजकारण येऊ देऊ नये,’असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.‘विरोधक आम्हाला पाठिंबा देण्यास येत असल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण त्याचे राजकारण होऊ नये,’ असे टिकैत म्हणाले. ‘राजकीय नेते आमच्या भेटीसाठी येत असल्यास त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. या भागातील वाहतुकीची समस्या पोलिसांनी केलेल्या बॅराकेडिंगमुळे निर्माण झालेली आहे. शेतकर्‍यांनी वाहतूक रोखून धरलेली नाही,’ असेही टिकैत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -