घरमहाराष्ट्रकिरीट सोमय्यांना विरोधच - संजय राऊत

किरीट सोमय्यांना विरोधच – संजय राऊत

Subscribe

खासदार किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी हवी आहे. परंतु, शिवसेनेचा सोमय्या यांना विरोधच राहणार, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी युतीच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या जागेवरुन किरीट सोमय्या यांना उमेदवारी लढवण्याची इच्छा आहे. मात्र, मध्यंतरी भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले होते. यावेळी किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. ही टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोधच, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, ‘आधीच्या खासदारांनी ज्या प्रकारची वक्तव्यं शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांवर केले होती, ती योग्य नव्हती. टीका करायला हरकरत नाही. मात्र, आपण कोणत्या भाषेचा वापर करत आहोत, याचाही विचार कारयला हवा होता. कोणत्या मर्यादेपर्यंत टीका करावी, हे आधीच ठरवलं पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी भरपूर त्रास दिला. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केले आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपचे दिल्लीचे नेते संजय राऊत घेतील.’

- Advertisement -

किरीट सोमय्यांना इतका विरोध का?

मुंबई महापालिकेच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि शिवसेनेच्या नेतृत्त्वावर खालच्या पातळीवर जावून चर्चा केली होती. त्यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळ शिवसैनिक किरीट सोमय्यांना विरोध करत आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांनंतर केंद्रिय मंत्री पीयूष गोयल, भाजपचे मंत्री मनोज कोटक, प्रवीण छेडा यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -