घरदेश-विदेशपाहा : 'ही' आहे अजगर आणि मगरीची 'मेकअप गर्ल'

पाहा : ‘ही’ आहे अजगर आणि मगरीची ‘मेकअप गर्ल’

Subscribe

एक चार वर्षाची मुलगी चक्क अजगरचे दात घासत असून मगरीचा मेकअप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या चिमुकलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बऱ्याच लहान मुलांना प्राण्यांची विशेष आवड असते. काही लहान मुलांना प्राणी इतके आवडतात की ते त्यांना अगदी जिवापाड जपत असतात. तर काही लहान मुले त्यांचा मेकअप देखील करतात. अशाच एका धाडसी, शूरवीर आणि पराक्रमी मुलीचा सध्या सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंडोनेशिया येथील ही चार वर्षाची मुलगी चक्क अजगराच्या दातांना ब्रश आणि मगरीचा मेकअप करताना दिसत आहे. हे पाहून कोणाला विश्वास देखील बसणार नाही की, ही मुलगी अस काही करु शकेल.

- Advertisement -

या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ही ४ वर्षांची मुलगी बाथरुममध्ये बसली असून तिच्यासोबत एक पिवळ्या रंगाचा अजगर असून ती त्याचे दात घासत आहे. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या मगरीच्या पिलाला आंघोळ देखील घालत आहे. तर तिच्या मागे भली मोठी चोच असलेला पक्षी ती काय करत आहे ते पाहत बसला आहे.

- Advertisement -

तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हीच लहान मुलगी मगरीच्या बाळाला पावडर लावून तिचा मेकअप करत आहे.

सध्या या चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडिओला २० हजार रीट्वीट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -