घरताज्या घडामोडीईडीच्या अन्यायाविरोधात लढणारे सरनाईक हतबल का झाले?

ईडीच्या अन्यायाविरोधात लढणारे सरनाईक हतबल का झाले?

Subscribe

केंद्राच्या अखत्यारितील ईडी, सीबीआयचा गैरवापर

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधून रोखठोक भाष्य करत भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहे. (sanjay raut slam bjp on pratap sarnaik laterbomb)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, व प्रताप सरनाईक ईडीच्या टार्गेटवर आहेत. याचपार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. त्यात भाजपबरोबर जुळवून घेतल्यास बरे होईल. अशी मागणीच सरनाईक यांनी केली आहे. यामुळे याच पत्रावर संजय राऊत यांनी केंद्राच्या अखत्यारितील ईडी, सीबीआयचा गैरवापर भाजप करत असल्यचाआरोप केला आहे. कधीकाळी मोदी आणि अमित शहा यांच्यामागेही तपास यंत्रणा लागल्या होत्या.यामुळे त्याचा मनस्तापाची कल्पना त्यांना असावी. असेही राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरात म्हटले आहे.

- Advertisement -

सरनाईक यांच्यामागे गेल्या पाच महिन्यांपासून ईडी हात धुऊन मागे लागले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवल्यानेच आपल्याला त्रास दिला जात असल्याचे सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच केंद्रातील मोदींशी जमवून घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. यावरच राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा नाहक छळवाद राज्य सरकार थांबवू शकत नाही, हे लोकशाहीतले सगळ्यात मोठे दुर्देव असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ईडी कार्यालयात चौकशीत मूळ प्रश्न न विचारता राजकीय विषयांवरच प्रश्न विचारले जातात. असेही राऊत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींची ही कैफियत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मांडावी असेही राऊत यांनी आपल्या सदरात म्हटले आहे.


हेही वाचा – अनिल देशमुखांची अटक अटळ? ईडीच्या कार्यालयात गैरहजर

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -