घरमहाराष्ट्रबारसूतील आंदोलकांना मारहाण दिल्लीच्या आदेशाने, संजय राऊतांचा आरोप

बारसूतील आंदोलकांना मारहाण दिल्लीच्या आदेशाने, संजय राऊतांचा आरोप

Subscribe

बारसूमध्ये जो काही अमानुष खेळ सुरू आहे, तो दिल्लीच्या आदेशाने सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्याकडून हा आरोप करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू गावात रिफायनरी प्रकल्प होऊ नये, यासाठी बारसू गावातील लोकांनी आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन आज चिघळले असून या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. पण पोलिसांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तर बारसूमध्ये जो काही अमानुष खेळ सुरू आहे, तो दिल्लीच्या आदेशाने सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्याकडून हा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “सर्वेक्षणाच्या जागी महिलांनी घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून त्यांना बदडून काढण्यात आले. आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांना अटक करण्यात आली. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमचे खासदार विनायक राऊत त्यांना या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले आणि अटक करून राजापूरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. एका बाजूला तुम्ही म्हणता चर्चेतून तोडगा काढायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आंदोलकांना गुरासारखे बदडवता. कदाचित तु्म्ही त्यांच्यावर गोळ्याही झाडाल आणि बारसूची भुमी रक्ताने भिजवाल. त्यावर तुम्ही तुमची रिफायनरी उभी कराल,” अशी टीका संजय राऊत यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर कोकणामध्ये हा अमानुष खेळ सुरु आहे, तो दिल्लीच्या आदेशाने सुरु आहे. दिल्लीने सांगितले आहे, काही झाले तरी रिफायनरी करायलाच हवी. कारण, परदेशी कंपन्या आहेत. दिल्लीवाल्यांनी त्यांच्याशी गळाभेट केली आहे. मोठ्या प्रमाणात कमिशनबाजी आहे. तर मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी खाजगी लोकांनी केलेली आहे. त्यामुळे या आंदोलकांवर हा अमानुष हल्ला करण्यात आला आहे, असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मोगलाईचे आदेश देवून देवेंद्र फडणवीस मॉरिशसला…
देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मॉरिशसला गेले आहेत. यावरून देखील संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, चर्चेतून तोडगा निघावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. मु्ख्यमंत्र्यांनी देखील असेच आवाहन केले आहे. पण फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काहीही बोललेले नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मॉरिशला गेले आहेत. या महाराष्ट्रात मोगलाईचे आदेश देऊन ते तेथे गेले आहेत. असे म्हणावेसे वाटत असल्याचे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -