घरमहाराष्ट्रवाढदिवस साजरा करणार नाही - उदयनराजे भोसले

वाढदिवस साजरा करणार नाही – उदयनराजे भोसले

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत. या घटनेवर संपूर्ण देशात नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहेत. २४ जानेवारीला उदयनराजेंचा

काय म्हटले आहे प्रसिद्धी पत्रकात?

उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी आणि कार्यकर्त्यांनी आमच्या वाढदिवसांचे शुभेच्या फलक सातरा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कोठेही लावू नयेत. तसेच आम्हाला वाढदिवसानिमित्त हार-पुष्पगुच्छा इत्यादी भेट म्हणून देऊ नये, असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे. यापुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘वाढदिवसाचे औचित्य आम्हाला फार आहे असे नाही, वाढदिवस येतील जातील, तथापी आजच्या घडीला जवांनाच्या दु:खात सहभागी होता यावे, या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’, असे उदयनराजे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -