घरमुंबईदहिसरच्या ठाकूर मॉल समोर स्फोट

दहिसरच्या ठाकूर मॉल समोर स्फोट

Subscribe

दहिसरच्या ठाकूर मॉल परिसरात स्फोट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर येथील स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दहिसरच्या ठाकूर मॉल परिसरात स्फोट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. काशीमीरा पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली आहे. स्फोटाची माहिती मिळताच बॉम्ब शोधक घटनास्थळी दाखल झाले आहे. पश्चिम दुर्तगती महामार्गाजवळ हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहाच्या सुमारास दुर्तगती काशिमीरा येथील ठाकूर मॉलजवळील रोडवर हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहचले. या घटनास्थळी एक प्लास्टीकची बाटली आणि मेटल बॉल आढळली. घटनास्थळी काही दुर्घटना होऊनये यासाठी बॉम शोधक पथकालाही याची माहिती देण्यात आली. स्फोट झाल्यानंतर तेथील वस्तू या तपासासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -