घरताज्या घडामोडीईश्वर चिठ्ठी म्हणजे काय ? शिवसेनेच्या बागलकरांप्रमाणे सतीश सावंतांनाही ईश्वर चिठ्ठीचा फटका

ईश्वर चिठ्ठी म्हणजे काय ? शिवसेनेच्या बागलकरांप्रमाणे सतीश सावंतांनाही ईश्वर चिठ्ठीचा फटका

Subscribe

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणी आज पार पडली. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणूकीत भाजपने चमकदार कामगिरी केली. तर महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे सतीश सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत ईश्वर चिठ्ठीने पराभव झाला. पण याआधीही मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांनाही याच ईश्वर चिठ्ठीचा फटका बसला होता. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे अतुल शहा आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर या दोन्ही उमेदवारांना समसमान मतदान झाले होते. त्यानंतर ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये भाजपचे अतुल शहा यांना ईश्वर चिठ्ठीचा कौल मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही विद्यमान अध्यक्ष असलेल्या सतीश सावंत पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचे विठ्ठल देसाई आणि शिवसेनेचे सतीश सावंत यांना समसमान मतदान झाले होते. त्यामुळेच ईश्वरी चिठ्ठी काढण्याचा निर्णय़ झाला.

ईश्वर चिठ्ठी म्हणजे काय ? ही चिठ्ठी कधी काढली जाते ?

जेव्हा एखाद्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मतदान होते, तेव्हा मतांची मोजणी पुन्हा एकदा करण्यात येते. या मोजणीनंतरही ही संख्या समान असेल तर दोन्ही उमेदवारांच्या नावाने चिठ्ठी पाडली जाते. या चिठ्ठीला ईश्वरी चिठ्ठी असे म्हणतात. या चिठ्ठीत ज्या उमेदवाराचे नाव येते त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येते.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यात जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या चाले ग्रामपंचायत निवडणुकीतही अशाच प्रकारच्या ईश्वर चिठ्ठीने निकाल देण्यात आला होता. या निकालात दोन्ही सदस्यांना समसमान मतदान झाले होते.

अनेकदा ग्रामपंचायत, नगराध्यक्ष, नगर परिषद किंवा नगरसेवक पदाची निवडणूक असते, अशावेळी गरजेनुसार ईश्वरी चिठ्ठीचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये जेव्हा दोन उमेदवारांना समसमान मतदान होते, अशावेळी या चिठ्ठीचा वापर केला जातो. याआधीही राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत, नगराध्यक्ष निवडणुकीत अशा ईश्वर चिठ्ठीचा वापर करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -