घरमहाराष्ट्रशाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक यंत्रणांकडे

शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक यंत्रणांकडे

Subscribe

कोरोनाची परिस्थिती पाहून महापालिकेचे शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत.

1 जुलैपासून शाळा सुरू होणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असली तरी शाळा सुरू करण्याची जबाबदारी ही स्थानिक यंत्रणांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पाहून महापालिकेचे शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. त्यामुळे राज्यामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

कोरानाची स्थिती लक्षात घेऊन निर्णय

नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून शाळा सुरू होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण शिक्षण विभागाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नसल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भातील सर्वतोपरी निर्णय घेण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडून स्थानिक यंत्रणांवर सोपवली आहे. स्थानिक पातळीवरील कोरानाची स्थिती लक्षात घेऊन महापालिका शिक्षणाधिकारी किंवा जिल्हाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. ज्या भागामध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, त्या भागामध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहे. तर प्रादुर्भाव अधिक असलेल्या कंटेन्मेट झोनमधील शाळा सुरू करण्यात येणार नसल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी दिली.

- Advertisement -

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कंटेन्मेट झोनमध्येही वाढ होत आहे. मे महिन्यातील कंटेन्मेट झोनच्या तुलनेत जूनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक यंत्रणांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे 1 जुलैला शाळा सुरू होईल की नाही याबाबत स्थानिक कोरोनाच्या स्थितीवरच निर्णय घेण्यात येईल, असेही विशाल सोलंकी यांनी स्पष्टपणे सांगितले.

शाळांनी कोणती काळजी घ्यावी

शाळा सुरू करताना मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत शिक्षण विभागाकडून काही सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखणे शक्य व्हावे यासाठी शाळा दोन सत्रांमध्ये सुरू करणे, एका वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करणे, शाळा स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण, पाणी याची सुविधा उपलब्ध करून देणे, बसेसमध्ये मुलांची गर्दी होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापनाने व्यवस्था करावी, धान्य व पाठ्यपुस्तक वाटपांचेही योग्य नियोजन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना दिल्या असल्याचेही सोलंकी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -