घरक्राइममुंबईतील नागपाड्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

मुंबईतील नागपाड्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

Subscribe

एकीकडे मुंबई शहर हे मुलींसाठी सुरक्षित असल्याचे वारंवार पोलीस, प्रशासनाकडून सांगितले जाते. तर, दुसरीकडे मागील काही दिवसांत मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे मुंबई शहर हे मुलींसाठी सुरक्षित असल्याचे वारंवार पोलीस, प्रशासनाकडून सांगितले जाते. तर, दुसरीकडे मागील काही दिवसांत मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच दक्षिण मुंबईतील नागपाडा भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (school principal rapes minor student in nagpada mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, एका शाळेच्या मुख्याध्यापकाने प्रेम प्रकरण घरी सांगण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. मुख्याध्यापकाने मुलीला केबिनमध्ये बोलावून हे कृत्य केल्याची माहिती पीडितेने दिली. याप्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुख्याध्यापक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना गेल्या डिसेंबर महिन्यात घडली होती.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापकाने या पूर्वीही पीडित मुलीचा दोनवेळा विनयभंग केला. याप्रकरणी तक्रार दाखल करताना पीडितेच्या माहितीनुसार पहिली घटना डिसेंबरमध्ये घडली. मुख्याध्यापकाने पीडित मुलीला तिचे शाळेतील एका मुलाशी असलेल्या अफेअरबद्दल धमकावले. याबाबत तिच्या पालकांना सांगण्याची तिला धमकी त्याने दिली. आरोपी मुख्याध्यापकाने तिला त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये बोलावले, याठिकाणी त्याने मुलीवर अत्याचार केले. तर दुसरी घटना ही शनिवारी घडली. या घटनेमुळे मुलीच्या मनावर परिणाम झाला. यामुळे तीच्या वागण्यात बदल झाल्याने पालकांनी तिची आणि तिच्या मित्रांना विचारपूस केली.

मित्रांनी दिलेल्या माहितीनंतर या घटनेची माहिती समोर आली. त्यानंतर तातडीने पीडिकतेच्या पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर आरोपी मुख्याध्यापक हा फरार झाला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची माध्यमिक शाळा आहे. ती एका एज्युकेशन ट्रस्टद्वारे चालवली जाते, असे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – धक्कादायक! पाच दिवसांत पुण्यातील नदीपात्रात आढळले दोन महिलांसह ४ मृतदेह

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -