घरताज्या घडामोडीअरे बापरे! कोल्हापुरात चार महिन्यांपासून शिक्षकच नाहीत

अरे बापरे! कोल्हापुरात चार महिन्यांपासून शिक्षकच नाहीत

Subscribe

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. विविध प्रयोग केले जातात. मात्र, दुसरीकडे या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल तीन महिने कोल्हापूरमध्ये शिक्षक नसून आज दऱ्याचे वडगाव प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हापरिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले आहे. ‘शिक्षक आम्हाला मिळालेच पाहिजेत, शिक्षण आमच्या हक्काच आहे’, अशा घोषणा देत अवघ्या चौथीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने अधिकाऱ्यांनाच दारात यायला भाग पाडले. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी व्यथा मांडत शिक्षक देण्याची मागणी केली आहे.

तीन महिने शिक्षक नाही

दऱ्याचे वडगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळा असून या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये चौथीच्या वर्गाच्या दोन तुकड्या असून चौथीच्या वर्गावरील एका शिक्षकाची तीन महिन्यांपूर्वी पदोन्नतीवर बदली झाली आहे. तर मुख्यध्यापक पूजा शेटवे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने त्यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यध्यापकाचा प्रभारी कार्यभार एका शिक्षकावर देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून चौथीच्या दोन वर्गांवर शिक्षक नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे होत आहे नुकसान

शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार पालकांनी केली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे.

चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मिळाव याकरता हातात फलक घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलने केली. या आंदोलनाची कल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने आणि शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना एक दिवस अगोदर देण्यात आली होती. मात्र, तरीही निवेदन घेण्यास कोणीही न आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षण विभागातील कर्मचारी, अधिकारी या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसले.

- Advertisement -

हेही वाचा – गावांची जातिवाचक नावं रद्द होणार; ठाकरे सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -