घरमुंबईकपडे बदलताना टेलर काढायचा तरूण मुलींचे व्हीडिओ, पोलिसांनी केली अटक!

कपडे बदलताना टेलर काढायचा तरूण मुलींचे व्हीडिओ, पोलिसांनी केली अटक!

Subscribe

अनेकवेळा लेडीज ट्रायल रूम आणि सुरक्षीतता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकताच अंधेरीतील लोखंडवालामध्ये असाच एक प्रकार घडला. अंधेरीत ट्रेलरच्या दुकानात ट्रायल रूममध्ये छुप्या कॅमेराद्वारे चित्रीकरण केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ट्रेलरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या ताब्यात असलेल्या टेलरची चौकशी सुरू आहे. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. टेलरने आपल्या दुकानाच्या ट्रायल रुममध्ये छुप्या पद्धतीनं कॅमेरा ठेवला होता. त्यामध्ये मुलींचे कपडे बदलताना व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते.

असा प्रकार उघडकीस आला

लोखंडवाला परिसरात एका मैत्रिणीच्या ओळखीमध्ये तरुणीनं कपडे शिवण्यासाठी दिले होते. ते कपडे घेऊन येण्यासाठी टेलरकडे गेली. त्यावेळी टेलरने कपडे होत आहेत की नाही हे चेक करून पाहण्यासाठी ट्रायल रुम वापरण्यास सांगितली. तरुणीने कपडे ट्राय करून पाहिले. मात्र सहज तिचं लक्ष समोर असलेल्या पिशवीकडे गेलं. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला. तरुणीनं पिशवी उघडली त्यावेळी त्यामध्ये कॅमेरा होता. तिथे उघडून पाहिल्यानंतर तिच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला.

- Advertisement -

त्यानंतर त्या तरूणीने कॅमेरा घेऊन टेलरला जाब विचारला. तरुणीनं तातडीनं तिच्या मैत्रीणीसह कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. तरुणीच्या धाडसामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून टेलरची कसून चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -