घरमहाराष्ट्रज्येष्ठ कलावंत डॉ. हेमू अधिकारी यांचे निधन

ज्येष्ठ कलावंत डॉ. हेमू अधिकारी यांचे निधन

Subscribe

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ कलावंत डॉ. हेमू अधिकारी यांचे सोमवारी त्यांच्या शिवाजी पार्कमधील राहत्या घरी वयाच्या ८१ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपटश्रृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक, साहाय्यक अभिनेता म्हणून विविध नाटक, मालिका आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे.

सोमवारी रात्री अंत्यसंस्कार
डॉ. हेमू अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. रात्री उशिरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रंगकर्मी अजित भुरे, प्रसाद कांबळी, आनंद इंगळे, विद्याधर जोशी आणि संतोष कानेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

शास्त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी
डॉ. हेमू अधिकारी हे शास्त्रज्ञही होते. त्याचबरोबर लोकविज्ञान, अण्वस्रविरोधी शांतता चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते होते. आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी ते ओळखले जात. मराठीतल्या प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील हेमू अधिकारी हे मोठे नाव होते. त्यांनी अनेक टीव्हीवरील मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

‘वजूद’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ सारख्या यशस्वी चित्रपटात केले काम
हेमू अधिकारी यांनी आजवर ४५ नाटके, १६ मराठी-हिंदी चित्रपट आणि ७ टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्याचबरोबर ‘वजूद’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘डिटेक्टिव्ह नानी’ यांसारखे हिंदी चित्रपट तर संध्याछाया, ढोलताशे, हसवा फसवी यांसारख्या मराठी नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -