घरमहाराष्ट्रतारीख आणि वेळ ठरवून द्यावी...मी मातोश्रीवर येईन; नवनीत राणांचं शिवसैनिकांना प्रतिआव्हान

तारीख आणि वेळ ठरवून द्यावी…मी मातोश्रीवर येईन; नवनीत राणांचं शिवसैनिकांना प्रतिआव्हान

Subscribe

राज्यात हनुमान जयंती आणि हनुमान चालीसावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा वाचा अन्यथा आम्ही मातोश्रीच्या बाहेर वाचून असं आव्हान दिलं. त्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अशात आता खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना प्रतिआव्हान दिलं आहे. शिवसेनेने तारीख आणि वेळ ठरवून द्यावी, मी मातोश्रीवर येऊन दाखवते, असं प्रतिआव्हान नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिलं आहे.

जे लोक म्हणतात मुंबईमध्ये येऊन दाखवा, मी मुंबईची मुलगी आहे आण विदर्भाची सून आहे. माझ्यासोबत दोन ताकद आहेत. ज्यांना वाटतं मी येऊ शकत नाही त्यांनी तारीख द्यावी, त्यांनी वेळ ठरवून द्यावा. बघू कोणात ताकद आहे. मला शिवसैनिकांनी मुंबईत येण्यापासून रोखून दाखवावं, असं प्रतिआव्हान नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिलं.

- Advertisement -

जर शिवसैनिक तिथे उपस्थित असेल तर माझी त्यांना विनंती आहे की नवनीत राणा यांना थांबवण्यासाठी एवढी गर्दी करुन प्रदर्शन करण्याची गरज नाही आहे. फक्त दोन पाऊल आतमध्ये जा ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली ते विचार अजूनही जिवंत आहेत की नाही आहेत. एकदा हनुमान चालीसा पठण करा. मी तुमच्यासोबत येईन लढणार आहे असं म्हटलं नाही. मी म्हटलं देवाचा नावा घेऊन तुम्ही आजचा दिवस साजरा करा, अशी विनंती केली.

उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा वाचावी

आमदार रवी राणा यांनी तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा वाचावी अन्यथा आम्ही मातोश्रीवर जाऊन वाचू, असं आव्हान राणा यांनी दिलं.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -