घरताज्या घडामोडीशाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढं जावं लागेल - शरद पवार

शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढं जावं लागेल – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने ‘८ दशके कृतज्ञेची’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढं जावं लागेल, असे आवाहन केले. जीवनामध्ये विचारधारा जपणे अत्यंत गरजेचे आहे. विचारधारा स्वीकारली त्या मार्गाने जाण्याचा अखंड प्रयत्न करायचा असतो. तो प्रयत्न करणे हाच खऱ्या अर्थाने अन्य सगळ्या पीढीच्या लोकांना प्रोत्साहन देत असतो, असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या शिकवणींना उजळणी दिली. शिवाय, महाराष्ट्रातील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले.

ज्योतीराव फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करुन चालणार नाही. त्यांनी जी दृष्टी आपल्याला दिली त्या दृष्टीच्या आधारावर आधारीत एक प्रकारची मानसिकता तयार करण्याची खबरदारी पण घ्यायला हवी, असे शरद पवार म्हणाले. सार्वजनिक जीवनामध्ये आपण सर्व काम करत असतो. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकठिकाणी काम करतात. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसाच्या हिताच्या जपणूकीसाठी जिथे तुम्ही लक्ष देता त्यातून तुम्हाला शिकायला मिळते, पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे याची स्पष्ट्ता आपल्याला येत असते. त्यामुळे जागरुक राहून समाजकारण करण्याची कल्पना पण मनापासून जागरुत केली पाहिजे. मी गेली पाच-पन्नास वर्षे राज्यामध्ये तुमच्या समवेत काम करतोय. खरे तर ही संधी महाराष्ट्राच्या जनतेने दिली. महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली त्यामुळे आम्ही इपर्यंत येता आले. कुटुंबाच्या लोकांचे मार्गदर्शन असते, असे शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना पवारांनी आई-वडिलांच्या शिकवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधी नेहरुचा विचार आणि त्या विचाराची पताका घेऊन काम केले पाहिजे अशा प्रकारचे सूत्र त्या मातेने स्वीकारले. हे काम करत असताना कौटूंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने बजावली. याचा लाभ आम्हाला झाल्याचे देखील ते म्हणाले. त्यामुळे ज्यांच्यापासून आम्ही शिकलो त्यांचे स्मरण करणे याची अत्यंत आवश्यकता आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

“आज या देशाला भक्कम व्यवस्था बाबासाहेबांनी दिली. पण, त्यांनी इतरही क्षेत्रातही योगदान दिले. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या सरकारमध्ये बाबासाहेबांकडे पाण्याचे खाते होते. भाक्रा-नांगल धरणाच्या माध्यमातून अन्नधान्याचा प्रश्न सोडण्यास मदत झाली पाहिजे. पाण्यापासून वीज निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विज्ञानाचा आधार केला. त्या विचारांची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असे शरद पवार म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -