घरताज्या घडामोडीAfghanistan-taliban crisis: अफगाणिस्तान विषयावर शरद पवार म्हणतात...

Afghanistan-taliban crisis: अफगाणिस्तान विषयावर शरद पवार म्हणतात…

Subscribe

भारताने अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी विमाने पाठवली ही चांगली गोष्ट आहे. पण अफगाणिस्तानच्या निमित्ताने आता भारताच्या समस्येत आणखी भर पडणार आहे असे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत मांडले आहे. आजपर्यंत भारताला पाकिस्तान आणि चीनच्या माध्यमातून नेहमीच समस्या होत होती. पण आता या समस्येत अफगाणिस्तानच्या निमित्ताने भर पडणार आहे. त्यामुळेच भारताने सतर्क राहण्याची गरज असल्याचेही पवार म्हणाले. भारताला दीर्घकालीन पद्धतीने काळजी घ्यावी लागणार आहे. शरद पवार यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही भाष्य केले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताची सीमा पाहता ही सतर्कता गरजेची आहे असेही ते म्हणाले. तालिबान्यांनी केलेले विधानही मी एकले आहे. आम्हाला शांती हवी आहे, लोकांना भरवसा देऊ पाहत आहोत अशी विधाने करण्यात आली आहेत खरी. पण यामध्ये कितपत सत्यता आहे हे माहित नाही असेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अफगाणिस्तानसह पेगासिस प्रकरणातही मत मांडले. (Sharad Pawar commented on Afghanistan ongoing issue)

आता परिस्थिती बदलली आहे…

आजपर्यंत भारताचे परराष्ट्र धोरण होते, त्यानुसार सर्वच शेजारील राष्ट्रांसोबत भारताचे संबंध चांगले होते. त्यामध्ये फक्त चीन आणि पाकिस्तानचा अपवाद आहे. आज ज्या पद्धतीची स्थिती नेपाळमध्ये आहे, बांगलादेशातही परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे अशा बदललेल्या परिस्थितीत शेजारील राष्ट्रांसोबत नातेसंबंध टिकवण्यात ही रणनिती कितपत यशस्वी होते, याचा आढावा घेण्याची वेळ आता आली आहे. हा खूपच संवेदनशील विषय आहे. त्यामुळेच यावर अधिक भाष्य न करणे हेच योग्य आहे. त्यामुळेच परराष्ट्र धोरण कसे आहे, याबाबत आम्हालाही माहिती करून घ्यायला आवडेल. तसेच सरकारला काही मदत करता आली तर ती मदतही करू असेही पवार म्हणाले. देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. त्यामुळेच आमचेही या विषयावर दुमत नाही. पण सध्या परिस्तिती चांली नाही असेही पवारांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

पेगासिस प्रकरण 

 

- Advertisement -

पेगासिस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल, पी. चिंदबरम या संसद सदस्यांनी या विषयात बराच अभ्यास केला आहे. तिघांपैकी एकाला समितीत घेतल्यास पारदर्शकता वाढेल, असे मत त्यांनी मांडले. पण हा सर्वस्वी सुप्रीम कोर्टाचा अधिकार असल्याचे पवार साहेबांनी स्पष्ट केले.


हे ही वाचा – राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं रोखठोक उत्तर


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -