घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या हस्ते पॅगोडाचे लोकार्पण

शरद पवारांच्या हस्ते पॅगोडाचे लोकार्पण

Subscribe

पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अशोक सर्वांगीण विकास सोसायटी यांच्यातर्फे पॅगोडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पॅगोडाचे लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

अशोक सर्वांगीण विकास सोसायटी पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पॅगोडा लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कमल शिलवंत यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त मकमलआईफ पुरस्कार वितरण समारंभही आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने लोकनेते शरद पवार यांना अशोकरत्नफ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती अशोक सर्वांगीण विकास सोसायटी पुणेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. अशोक शिलवंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठोमसे पाटण जिल्हा सातारा येथून भगवान बुद्धांच्या अस्थी (धातू) बौद्धरूप सम्राट अशोकांची मूर्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हत्तीवरून मिरवणूक निघणार आहे. तर मंगळवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता राजप्रिया अशोकवन शक्ती सातारा येथे नवनिर्मित पॅगोडा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री महा. राज्य राजकुमार बडोले, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी रस्ते विकास मंत्री महा.राज्य विक्रमसिंह पाटणकर, सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले,सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, सातार्‍याचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत असेही डॉ. शिलवंत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -