घरताज्या घडामोडीRahul Bajaj : सर्वसामान्यांच्या जीवनात टू व्हिलर तंत्रज्ञानाने बदल घडवणारा अवलिया, शरद...

Rahul Bajaj : सर्वसामान्यांच्या जीवनात टू व्हिलर तंत्रज्ञानाने बदल घडवणारा अवलिया, शरद पवारांची राहुल बजाज यांना श्रद्धांजली

Subscribe

शरद पवार आणि राहुल बजाज यांचे फार जुने संबंध आहेत. बजाज यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचे फार मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे.

बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती, पद्मभूषण राहुल बजाज यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ८३व्या वर्षी राहुल बजाज यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने औद्योगिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुख: व्यक्त केले आहे.  प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे ते नातू. त्यांनी टू व्हिलर तंत्रज्ञानाने समाजात परिवर्तन घडवून आणले. विशेषत: गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणले होते.राहूल बजाज यांच्या निधनाने मला फार मोठा धक्का बसला असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. शरद पवार आणि राहुल बजाज यांचे फार जुने संबंध आहेत. बजाज यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचे फार मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

राहूल बजाज यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया देत जुन्या आठणींना उजाळा दिलाय. त्या म्हणाल्या, मी लहानपणापासून त्यांना ताऊजी म्हणायचे. ताऊजी म्हणजे मोठे काका. माझ्या वडिलांपेक्षा ते दोन वर्षांनी मोठे. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे पहिल्यापासून फारच जवळची मैत्री होती. आमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट दिवसात ते आमच्यासोबत उभे राहिले. राहूल चाचा दिलदार माणूस, आमच्या कुटुंबावर प्रेम करणारा माणूस, पवार आणि सुळे कुटुंबासाठी त्यांचे जाण्याने वैयक्तिक हानी झाली आहे. आम्ही अनेकदा त्यांच्या वर्ध्याच्या घरी जायचो. अनेकदा आमच्या चर्चे व्हायच्या. त्यांच्या जाण्याने अतिशय अस्वस्थता आणि दुख: झाले आहे.

त्यांच्या बोलण्याची शैली पद्धत त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. जरी तुम्ही किती ही मोठे असाल तरीही जे खरे आहे ते तोंडावर बोलायचे. नेहमीच ते देशाच्या राज्याच्या, वैयक्तिक आयुष्यासाठी जे योग्य होते तेच ते कायम सांगत आले. व्यावसायिक क्षेत्रातील मोठा नेता आजा आपल्याला सोडून गेला. त्यांच्या पत्नी मराठी होत्या त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण मराठी होते. त्यांचे घर आमच्यासाठी फार जिव्हाळ्याचे होते. माहात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्याशी त्यांचे फार जवळचे संबंध होते. बजाज कुटुंब आम्ही फार जवळून पाहिले. त्यांचे कुटुंब फार साधे आणि शिस्तीचे होते,असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले. भारतीय उद्योग क्षेत्रातील ते नायक होते. त्यांच्या कामाने कॉर्पोरेट क्षेत्र नव्याने उदयास आले. बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळात बजाज उद्योग समूहाचा देशात तसेच बाहेर मोठा विस्तार केला. उद्योगाला आधुनिक व्यवस्थापन तंत्राची जोड देताना त्यांनी ‘बजाज’ हे ब्रँड नाव सर्वतोमुखी केले. देशाच्या उद्योग विश्वासमोरील समस्यांबद्दल आपली मते ते परखडपणे मांडत. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगार निर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीत देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे – भगतसिंह कोश्यारी , राज्यपाल 

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

राहुल बजाज आणि बजाज ग्रुपचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते. गांधीजींशी या परिवाराचे चांगले संबंध होते. गांधीजी वर्धेला येण्यात या परिवाराचा मोठा वाटा होता. ऑटो मोबाईल क्षेत्रात बजाजने केलेले काम अतिशय उल्लेखनीय आहे. राहूल बजाज स्वत: अतिशय आऊट स्पोकन होते. ते केवळ एक उद्योजक नव्हते तर ते अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्याला मदत करायचे. त्यांच्या संस्था चांगस्या प्रकारचे काम करतात. व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता खऱ्या अर्थाने काम करतात. राज्यसभेत गेले होते व्हा भाजपने त्यांना समर्थन दिले. माझे व्यक्तिगत संबंध चांगले होते. बरेचदा त्यांच्याशी माझ्या चर्चा होत्या. त्यांचे जाणे हे औद्योगिक क्षेत्राचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी झाली आहे. देवेंद्र फडणवीस,  विरोधी पक्ष नेते 

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.तब्बल ५दशकं बजाज समूहाचं नेतृत्व करणाऱ्या राहुलजींनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.त्यांचा जीवनप्रवास तरुण उद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

 

पद्मभूषण, प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्ता ऐकून फार दुख: झाले. बजाज कुटुंबियांच्या दुख:त आम्ही सहभागी आहोत नारायण राणे, केंद्रीय मंत्री

राहूल बजाज यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी भारतात पहिल्यांदा टू व्हिलर ब्रँड केला. त्यांनी राज्यसभेतही चांगली कामगिरी पार पाडली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.


हेही वाचा – Rahul Bajaj Passes Away: बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन; ८३व्या…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -