घरताज्या घडामोडीनिवडणुका कधी लागतील सांगायला मी काही ज्योतिषी नाही, शरद पवारांचं वक्तव्य

निवडणुका कधी लागतील सांगायला मी काही ज्योतिषी नाही, शरद पवारांचं वक्तव्य

Subscribe

शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत दौऱ्याबाबतची माहिती दिली. 

राज्यात पुन्हा निवडणुका लागू शकतात अशी चर्चा आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राज्यात पुन्हा निवडणुला झाल्या तर आम्ही तयार आहेत. निवडणुका कधी लागणार हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सत्तांतराबाबत भाष्य करणार नाही. निवडणुका नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत. शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत दौऱ्याबाबतची माहिती दिली.

मुख्यमंत्री दौऱ्यावर निघतात ही चांगली गोष्टी आहे. पण त्यांनी कुठे जायचं हा त्यांचा निर्णय. आज विरोधी पक्षाने दौरा काढला तो कुठे काढला, जिथे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. लोक संकटात आहेत अशा ठिकाणी दौरा काढला. स्वागत, सत्कारासाठी दौरा काढला नाही, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असं म्हटलं होतं. तसंच, सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका लागतील असंही ते म्हणाले होते. दरम्यान, आज त्यांनी निवडणुका लागतील की नाही याबाबत आपला शब्द फिरवला आहे. आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले होते की, “राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळे तयारी आत्तापासून करा.”

आज नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, सध्याच्या राज्यकर्त्यांना प्राधान्य वेगळं वाटत असेल. राज्य कशाप्रकारे चाललंय, याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. निवडणुका आल्या तर आम्ही तयार आहोत. ओबीसी आरक्षणात फार मोठा वर्ग सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बाहेर जाईल, अशी भीती वाटते आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सरकार विश्वासाने चालवू शकतो असं वाटत आहे, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीय, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -