घरताज्या घडामोडीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?, शरद पवारांनी सांगितला किस्सा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?, शरद पवारांनी सांगितला किस्सा

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महत्त्वकांक्षा असल्यामुळे मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी आता राज्याच्या हितासाठी काम करावे केवळ सरकार पुर्णवेळ टीकेल हे सांगणे सोडावे अशी टीका फडणवीस यांनी केली होती. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले याबाबतचा किस्सा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी पवार यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले त्यांच्या भाषणात त्यांची भूमिका मांडली आहे. त्याच्यावर फडणवीसांनी उत्तर देताना त्यांची मते मांडली आहेत. त्याच्यामध्ये काही करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असे सांगितले आहे. यावर पवार म्हणाले अत्यंत जबाबदारीने सांगतो की महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांचा समावेश होता त्यात माझाही किंचीतसा सभाग होता. मी ज्यावेळी आमदारांची बैठक घेतली सगळ्या त्या बैठकीत नेतृत्व कोणी करायचे याच्याबाबत ३ ते ४ नावे आले होते. परंतु उद्धव ठाकरे ती गोष्ठी स्वीकारण्यासाठी तयार नव्हते ते माझ्या शेजारी बसले होते. शेवटी विचारले काय करायचे कोणाला करायचे आणि उद्धव ठाकरेंच्या हाताला धरले आणि मी तो हात वर केला.

- Advertisement -

त्यांची हात वर करण्याची तयारी नव्हती त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयार नव्हती त्यांना सक्तीने हात वर केला नंतर त्यांनी सांगितले त्यांचे वडिल आणि मी सहकारीहोतो यांना वयाच्या ४ ते ५ वर्षांपासून पाहिले आहे. बाळासाहेब माझे मित्र होते आमचे राजकीय मतभेद होते पण व्यक्तीगत सलोखा होता. दिलदार व्यक्ती होते त्या गृहस्थांनी योगदान दिलं आहे. ज्यावेळी सरकार बनवण्याचा वेळा आला तेव्हा त्यांच्या पक्षाचे आमदार अधिक होते. त्यावेळी त्यांच्या पक्षाचा नेता करायचा ठरल्यानंतर आपल्या जुन्या मित्राच्या मुलाला ही जबाबदारी घ्यायला भाग पाडावे असा माझा आग्रह होता. त्यामुळे सक्तीने त्यांचा हात वर केला आणि त्यांचा हात वर केला त्याचे सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. फडणवीसांना विनंती करेल की कृपा करुन अशा गोष्टी तुम्ही आक्षेप घेऊ नका, त्यांना काही माहिती असेल त्यांनी सोबत काम केले आहे त्यामुळे त्यांना अनुभव आहे परंतु त्यांनी असे आरोप करु नये असे मला वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेसने एकत्र बसून निर्णय़ घेतला आहे की, शिवसेना संपुर्ण नेतृत्व करेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी ते वसूलीचे सॉफ्टवेअर दाखवावे, शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -