घरक्रीडाIPL 2021 : ख्रिस गेल IPL एक्झिटवर पीटरसनचा मोठा गौप्यस्फोट

IPL 2021 : ख्रिस गेल IPL एक्झिटवर पीटरसनचा मोठा गौप्यस्फोट

Subscribe

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने ख्रिस गेलच्या आयपीएल एक्झिटच्या निमित्ताने एक मोठा खुलासा केला आहे. पंजाब किंग्जचा बायो बबबल सोडण्याचे मुख्य कारण ख्रिस गेलने सांगितले. ख्रिस गेलने आयपीएल हंगामातून बाहेर पडताना मानसिक थकवा आल्याचे कारण पुढे केले होते. पण केविन पिटरसनने गेल मालिकेतून बाहेर का बाहेर पडला ? याचे कारण सांगितले आहे.

केविन पीटरसनने गेल बाहेर पडण्याचे कारण पंजाब किंग्जच्या डगआऊटमध्ये त्याला व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याचे कारण पुढे केले आहे. गेलचा वापर हा केवळ गरजेनुसार केला गेल्याचा आरोप पीटरसनने केला आहे. गेलच्या वाढदिवसाच्या दिवशीही त्याला खेळवले नसल्याची खंत पीटरसनने बोलून दाखवली आहे. एखादा खेळाडू जो एखाद्या फ्रॅंचायसीसाठी ४२ व्या वर्षीही योगदान देत असेल आणि तो जर समाधानी नसेल तर त्याला जे करायचे आहे ते करू द्यावे असेही पीटरसनने म्हटले आहे.

- Advertisement -

यंदाच्या आयपीएल हंगामात ख्रिस गेलने एकुण १० सामन्यात १९३ धावा केल्या. गेलने यंदा २१.४४ इतक्या सरासरीने धावा केल्या. त्यामध्ये गेलचा सर्वाधिक धावांचा आकडा ४६ होता. गेलने आयपीएलच्या सरावाचे कारण पुढे करत आयपीएलच्या हंगामातून एख्झिट घेतली. गेल जेव्हा बाहेर पडला तेव्हा पंजाबने १२ सामन्यात केवळ १२ पॉईंट्स मिळवले होते.

गेलसारखा मोठा आणि गेम चेंजर खेळाडू गमावणे हे पंजाबच्या संघाला मोठा फटका असल्याचे मत सुनिल गावस्कर यांनी मांडले होते. एखाद्या संघात त्याची अनुपस्थिती ही नक्कीच जाणीव करून देणारी अशी आहे. एखादा परदेशी खेळाडू जेव्हा तुम्ही संघात घेता, तेव्हा आधीच्या कामगिरीकडेही पाहिले पाहिजे. गेल आता ४० वर्षांहूनही अधिक वयाचा आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्य नसेल ही गोष्टही मान्य करावी लागणार आहे. पण गेल गेम चेंजर आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे होते, असेही गावस्कर म्हणाले होते.

- Advertisement -

पीबीकेएसचे काय म्हणणे होते ?

जाब किंग्जने याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. पंजाब किंग्जने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट खेळताना मी क्रिकेट वेस्टइंडिज (CWI) बबल, कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) बबल आणि त्यानंतर IPL बबलमध्ये सहभागी झालो. आता मला मानसिकदृष्ट्या रिचार्ज आणि तंदुरूस्त व्हायचे आहे असे गेलले म्हटले होते.

४२ वर्षीय गेलने म्हटले आहे की, मी टी २० विश्व चषकात वेस्ट इंडिज संघाची मदत करण्यासाठी माझे संपुर्ण लक्ष देणार आहे. त्यामुळेच आता मी दुबईत ब्रेक घेत आहे. मला माझा वेळ देण्यासाठी पंजाब किंग्जचे धन्यवाद. माझ्या शुभेच्छा आणि अपेक्षा या नेहमीच टीमसोबत आहेत. येणाऱ्या सामन्यांसाठीही संघासाठी मी शुभेच्छा देतो, असेही गेल म्हणाला.

पंजाब किंग्जचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनीही गेलच्या या निर्णयाचा आदर राखला आहे. मी पंजाब किंग्जमध्ये गेलला कोचिंग दिली आहे. अनेक वर्षांपासून मी क्रिस गेलला ओळखतो. क्रिस गेल नेहमीच प्रोफेशनल राहिला आहे. तसेच एक टीमच्या रूपात त्याच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आगामी टी २० मालिकेसाठी तयारी करण्यासाठी क्रिस गेलने वेळ मागितल्याचेही कुंबळेने म्हटले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -