घरमहाराष्ट्र'शरद पवार माझं तिकीट कापणार होते, पण मीही त्यांच्याच तालमीत तयार झालोय'

‘शरद पवार माझं तिकीट कापणार होते, पण मीही त्यांच्याच तालमीत तयार झालोय’

Subscribe

माझ्यासह ४० आमदारांचे उद्धव ठाकरे यांच्यामार्फत शरद पवार हे तिकीट कापणार होते, असा आरोप आणि दावा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. "आमदार-खासदार आपल्या दारी" या कार्यक्रमात आलेले असताना शहाजीबापू पाटील यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आले.

राज्यात सध्या सर्व पक्षातील आमदार, खासदार आणि नेत्यांडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तसेच काही नेत्यांनी तर अचानकपणे काही गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटला आहे. माझ्यासह ४० आमदारांचे उद्धव ठाकरे यांच्यामार्फत शरद पवार हे तिकीट कापणार होते, असा आरोप आणि दावा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. “आमदार-खासदार आपल्या दारी” या कार्यक्रमात आलेले असताना शहाजीबापू पाटील यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आले. त्यानंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना देखील त्यांनी अनेक खुलासे केलेले आहेत.

शहाजीबापू पाटील हे सांगोल्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी “आमदार-खासदार आपल्या दारी” या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले की, “पवार साहेब हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. माझ्यासाठी ते गेली ४५ वर्षे हे राजकारणातील पालक होते. पण पवार साहेबांच्या राजकारणाचा ईतिहासाचा जर का बारकाव्याने अभ्यास केला तर त्यांच्याजवळ जे गेले त्या पक्षांना पवारांनी हळूच चिरडून टाकले आहे,” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तसेच, अजिक दादा, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि पवार साहेब यांचा प्लॅन सुरू होता की, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला १०-१५ जागांच्या वर जाऊ द्यायचे नाही. यासाठी सर्वसाधारण ४० लोकांची यादी त्यांच्याकडे होती, ज्यांचे तिकीट कापण्यात येणार होते. त्यात माझे देखील नाव होते. असा खुलासा शहाजीबापू पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

पवारांनी राज्यातील लहान पक्ष संपवले
राज्यातील अनेक लहान पक्ष हे शरद पवार यांच्याकडे प्रेमाने गेले. पण त्यांनी शेकाप पक्षासहित राज्यातील लहान पक्ष संपवले. तर शिवसेना ही राष्ट्रवादीच्या सोबत नसताना त्यांनी पवारांवर केलेल्या टीकेमुळे पवार त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही यावेळी शहाजीबापू पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

आम्ही मविआला पाडून डाव उलटवला…
तसेच, कोरोना आणि वेगवेगळ्या आजारांचे कारण देत त्यावेळी उद्धव ठाकरे हे मंत्रालयात येत नव्हते. हा धोका टाळून शिवसेना वाढली पाहिजे, या विचाराने खंबीर नेते असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व दिलं, असे यावेळी पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – नुकसानग्रस्त भागात सरकारच्या वांझोट्या भेटी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -