घरमनोरंजनSherlyn Chopra ची पोलिसात धाव, फायनान्सरच्या विरोधात वियनभंगाचा गुन्हा दाखल

Sherlyn Chopra ची पोलिसात धाव, फायनान्सरच्या विरोधात वियनभंगाचा गुन्हा दाखल

Subscribe

अभिनेत्री शर्लिन चोपडा हिचे नाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादाशी संबंधित राहिले आहे. त्याचसोबत आपल्या विधानांमुळे सुद्धा ती नेहमीच चर्चेत राहत असते. याच दरम्यान आता शर्लिन चोपडा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण तिच्यासोबत छेडछाड झाल्याचा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच तिने पोलिसात धाव घेतली आहे.

शर्लिन चोपडाने एखा फायनान्सरच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने फाइनान्सरवर वियनभंगाचा आरोप लावला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने एका व्हिडिओ रेकॉर्डिगचे पैसे देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला आहे. जेव्हा अभिनेत्रीने याचा विरोध केला तेव्हा फाइनानन्सरने तिला शिवीगाळ केली. या व्यतिरिक्त तक्रारीत शर्लिनने असे सुद्धा म्हटले आहे की, त्या व्यक्तिने तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे.

- Advertisement -

ANI Tweet:

- Advertisement -

शर्लिन चोपडा हिच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलिसांनी आरोपीच्या विरोधात आयपीसीच्या कलम ३५४,५०६५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

खरंतर शर्लिन चोपडा सध्या नवं-नवे खुलासे करत सर्वांना हैराण करते. याआधी तिच्या आणि राखी सावंत मध्ये सुद्धा वाद चिघळल्याचे दिसून आले होते. त्या दोघींनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले होते. परंतु नंतर त्या दोघी एकत्रित आल्याचे स्पॉट करण्यात आले.

या व्यतिरिक्त फिल्ममेकर साजिद खान यांच्यासंदर्भात सुद्धा शर्लिनने काही विधाने केली होती. जेव्हा ते बिग बॉसच्या घरात होते तेव्हा सुद्धा त्यांना तेथून बाहेर काढण्याचा पुरेपुर प्रयत्न तिने केला होता. दरम्यान, साजिद खानला त्या शो मधून तिला बाहेर काढता आले नाही. शर्लिन चोपडाने राज कुंद्रा प्रकरणी सुद्धा काही विधाने केली होती. अशातच आता या नव्या प्रकरणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 


हेही वाचा: मी पूर्णपणे बरा आहे… अपघाताची बातमी संजय दत्तने फेटाळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -