घरमहाराष्ट्रऔवेसींच्या औरंगजेब कबरीच्या दर्शनावरून वाद, शिवसेनेची एमआयएमवर टीका

औवेसींच्या औरंगजेब कबरीच्या दर्शनावरून वाद, शिवसेनेची एमआयएमवर टीका

Subscribe

एमआयएमचे खासदार अकबरूद्दीन औवेसी औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण उपस्थित होते. औवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने औवेसींवर टीका केली आहे.

औरंगजेबने इथल्या नागरिकांवर जिझिया कर लावला. हिंदू मंदिरं पाडली, लोकांना त्रास दिला. हिंदू धर्म नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न केला. खुल्ताबादमधील इतर दर्ग्यांमध्ये लोक जातात, पण त्या ठिकाणच्या औरंगजेबच्या कबरीचं दर्शन कोणीही घेत नाही. आज एमआयएम वाल्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. यामधून काहीतरी नवीन राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

- Advertisement -

यावर खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतात असे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरुन वाद निर्माण करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचे दर्शन घेतल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

अकबरुद्दीन औवेसी हे आज एका शाळेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. त्यासाठी आज आम्ही सर्व दर्ग्यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. एका कबरीचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या कबरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कबरींचे दर्शन घेतले, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी दिली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -