घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी-काँग्रेसची यादी तयार; मात्र शिवसेनेचे संभाव्य मंत्री फोनच्या प्रतिक्षेत

राष्ट्रवादी-काँग्रेसची यादी तयार; मात्र शिवसेनेचे संभाव्य मंत्री फोनच्या प्रतिक्षेत

Subscribe

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अवघे काही तास उरले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेसची यादी अंतिम झालेली आहे. मात्र अजूनही शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांना मातोश्रीवरून फोन गेला नसल्याने या सर्व संभाव्य मंत्र्यांची धाकधूक वाढली असून, हे सर्व संभाव्य मंत्री सध्या मातोश्रीच्या फोनची वाट बघत आहे. मंत्रीपद मिळणाची शक्यता असलेल्या काही संभाव्य मंत्र्यांना विचारले असता त्यांनी अजून तरी आम्हाला मातोश्रीवरून फोन आला नसल्याने आम्ही सध्या तरी फोनची वाट बघत असून, रात्री उशिरापर्यंत फोन येण्याची शक्यता असल्याचे या संभाव्य मंत्र्यांनी सांगितले.

शिवसेनेची यादी शेवटच्या क्षणी मिळणार? 

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या मंत्रिमंडळ विस्तार असल्याने शिवसेनेची यादी तयार झाली असून, ही यादी शेवटच्या क्षणी अधिकृतपणे प्रसिद्ध होणार आहे. नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेकडून ही काळजी घेतल्य़ाचे बोलले जात असून, उद्या सकाळपर्यंत शिवसेनेची यादी जाहीर होण्याची माबिती मिळत आहे.

- Advertisement -

यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता 

मुंबई – अनिल परब, रविंद्र वायकर किंवा सुनील प्रभू, सुनील राऊत
कोकण – उदय सामंत किंवा भास्कर जाधव, दिपक केसरकर
पश्चिम महाराष्ट्र – शंभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर
मराठवाडा – संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत
विदर्भ – आशिष जैसवाल, संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड
उत्तर महाराष्ट्र – गुलाबराव पाटील, दादा भुसे किंवा सुहास कांदे

हे वाचा – काँग्रेस १० मंत्री शपथ घेणार; थोड्याच वेळात काँग्रेसची यादी जाहीर

 

हे वाचा – राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना मंत्रिपद? पाहा संभाव्य मंत्र्यांची यादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -