घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या दिमतीला वकिलांची फौज, उभारली शिव विधी सेना

शिवसेनेच्या दिमतीला वकिलांची फौज, उभारली शिव विधी सेना

Subscribe

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, अनेक कायदेशीर समस्या निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिव विधी आणि न्यायसेना महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना म्हणजे शिवसेनेची वकील संघटना असेल. यामार्फत गरजू नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत मिळणार आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संघटनेची घोषणा करण्यात आली. पुढील महिन्यात तीन ते चार हजार वकील या संघटनेत असतील असं यावेळी सांगण्यात आलं. आज घोषणेवेळी १५० वकील उपस्थित होते.

- Advertisement -

सविस्तर वृत्त लवकरच

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -