घरमहाराष्ट्रकुणाच्या वाढदिवसाला आपण भैया नावाचा केक कापला, हे जरा आठवा: अयोध्या दौऱ्यावरून...

कुणाच्या वाढदिवसाला आपण भैया नावाचा केक कापला, हे जरा आठवा: अयोध्या दौऱ्यावरून राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

” कुणाच्या वाढदिवसाला आपण भैय्या नावाचा केप कापला, हे जरा आठवा. ज्या अयोध्येला चालला आहात. त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आपल्या नेत्यांची वक्त्यवे काय आहेत हे पण जरा समजून घ्या. कोण आहे योगी आदित्यनाथ तो टकला माणूस? तो टकला माणूस जो भगवे कपडे घालून वेड्यासारखा फिरत असतो असे म्हणणारे आता अयोध्येला जात आहेत.”अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. आज माध्यमांशी बोलताना राऊत यांनी राज ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार टीका केली.

“… जास्त बोललो तर तुम्हाला बाहेर पडणे अवघड होईल”

राऊत पुढे म्हणाले की, “मला तोंड उघडायला भाग पाडू नका, आता योगीजी त्यांचे स्वागत कशाप्रकारे करतात मला पाहायचे आहे. एक डकला माणूस भगवे कपडे घालून इथे-तिथे फिरतो आम्हाला लाज वाटते त्यांना असं बघून, राज्याचा विकासावर बोलत नाही.. अशी भाषा कोणाची होती. आता हे हिंदुत्त्ववादी झाले. ज्यांनी योगींच्या भगव्या कपड्यांचा अपमान केला होता. ते आता आम्हाला हिंदुत्त्व शिकवण्याची भाषा करत आहेत. जास्त बोललो तर तुम्हाला बाहेर पडणे अवघड होईल.” अशा इशारा राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

“… हे लक्षात आल्यानंतर शिवसेना युतीतून बाहेर पडली”

“ज्यांनी हिंदुत्वाचे कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे. 1992 ची दंगल विसरले का, ज्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केले? अयोध्येच्या आंदोलनात शिवसेनेने केलेले त्याग ते विसरलेत का? आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात आहे. आम्ही कोणालाही वापरू देत नाही, ज्या क्षणी आम्हाला वाटले आमचा वापर होत आहे. असे वाटले त्याक्षणी लाथ मारुन स्वाभिमानाने बाहेर पडणारे आम्ही शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाचा अपमान होत आहे, हे लक्षात आल्यानंतर शिवसेना युतीतून बाहेर पडली. त्यामुळे आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये.” तुम्ही अडचणीत याल, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.


लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक लागत नाहीत; राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -