घरमहाराष्ट्रशिवसेना आमदार पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

शिवसेना आमदार पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Subscribe

दराडे यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांचे अहवाल नाशिकच्या शासकीय लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासगी लॅबमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचणीतील सावळा गोंधळ समोर येत आहे. दरम्यान, आता विधानपरिषदेतील शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या कोरोना चाचणीच्या अहवालाचा गोंधळ समोर आला आहे. नरेंद्र दराडे यांची नाशिक येथील एका लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोना चाचणी केली तर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. तसंच दराडे यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांचे अहवाल नाशिकच्या शासकीय लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासगी लॅबमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे आता शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह असा प्रश्न सर्वांसह आमदार दराडेंनाही पडला आहे. शिवाय कोरोना चाचणीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

आमदार नरेंद्र दराडे हे अनेकदा कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे लक्षणं नसतानाही शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांनी प्रवरा येथील एका खासगी लॅबमध्ये आपल्या स्वॅबची तपासणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. यानंतर दराडे मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. रुग्णालयाने दराडे यांचा स्वॅब घेऊन पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णालयाच्या वतीने आमदार दराडे यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, आमदार दराडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामीण जिल्हा उपरुग्णालयाच्या वतीने तातडीने दराडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कात आलेले शिक्षक अशा एकूण २२ जणांचे स्वॅब घेऊन ते शासकीय लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. मंगळवारी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण दराडे कुटुंबालाच हादरा बसला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी पुन्हा खासगी लॅबमध्ये आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्याचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले. या अहवालात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे एकीकडे मनस्ताप देखील झाला, तर दुसरीकडे अहवाल निगेटिव्ह आल्याने आनंदही झाला. मात्र, या सर्व प्रकारावरुन पुन्हा एकदा कोरोना चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


हेही वाचा – राजस्थान सत्ता संघर्ष: सर्वोच्च न्यायालयात सचिन पायलट यांना दिलासा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -