घरमहाराष्ट्रवनमंत्री संजय राठोड प्रकरणी शिवसेनेचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’!

वनमंत्री संजय राठोड प्रकरणी शिवसेनेचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’!

Subscribe

चौकशीशिवाय कारवाई म्हणजे थेट शुळाचा वापर

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधी कारवाई करण्याबाबत शिवसेनेने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची पोलिसांकरवी चौकशी सुरू झाली असून, या चौकशीचा अहवाल येईस्तोवर राठोड यांच्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी मानसिकता सेना नेत्यांची झाली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा सुरू आहे. राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह आहे. राजीनामा देणे म्हणजे आरोप मान्य करून एखाद्याला शुळावर चढवण्यासारखे असल्याचे सेना नेत्यांचे मत पडले. भाजपचे नेते आरोप करतात म्हणून कारवाई करण्यात आल्यास राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडेल,असे मत सेनेच्या मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचे एका नेत्याने या प्रतिनिधीला सांगितले.

शिवसेनेत संजय राठोड यांच्यावरून दोन गट पडल्याचे दिसते आहे. मात्र, आधीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटाचे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात सेनेच्या खासदार भावना गवळी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बाजोरिया, देशमुख यांच्यासारखे नेते. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा का? संजय राठोड यांनी मीडियासमोर येऊ नये. संजय राठोड आणि परिवाराने नक्की कुठे राहावे? संजय राठोड यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

चौकशी अहवालाचे काय झाले?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याचा चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने चौकशीत कोणतीही कसूर नको, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या अहवालात तिला आलेल्या मोबाईल कॉल्सचे रेकॉर्ड, फॉरेन्सिक रिपोर्ट, संबंधित व्यक्तीचे कनेक्शन, बँक डिटेल्स आणि पासपोर्टची माहिती मिळणार आहे. याशिवाय पूजाने घेतलेल्या कर्जाऊ रकमांचा अहवाल आणि बँकेकडून यासाठी होत असलेल्या पाठपुराव्याचीही तपासणी चौकशीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. हा अहवाल राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर त्याचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -