घरताज्या घडामोडीCM आहात तर २३१ पत्र लिहण्याची गरज काय ? शिवसेनेचा फडणवीसांना सवाल

CM आहात तर २३१ पत्र लिहण्याची गरज काय ? शिवसेनेचा फडणवीसांना सवाल

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २३१ पत्र लिहिली असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला रेकॉर्डब्रेक अशी पत्रे लिहिण्याचा विक्रमच म्हणून याकडे पाहिले जात आहे. अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत फडणवीसांनी ही २३१ पत्रे मुख्यमंत्र्यांनी लिहिली आहेत. मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी फडणवीसांनी पत्र लिहिल्याचा संदर्भ अनेकदा दिला आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती आरटीआयच्या माध्यमातून मिळवली आहे. पण शिवसेनेने मात्र फडणवीसांच्या या पत्रांवर टीका केली आहे. फडणवीस स्वतःला मुख्यमंत्री समजतात, मग पत्र लिहिण्याची गरज काय ? असाही सवाल शिवसेनेने केला आहे. एन संकटात राज्याला केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी अर्थमंत्री किंवा पंतप्रधानांना एक तरी पत्र लिहिले का ? असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Fadnavis letters

- Advertisement -

विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा पत्र लिहून मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा संदर्भ अनेक ट्विट्समध्ये दिला आहे. म्हणूनच गेल्या दीड वर्षात विरोधी पक्षनेत्याने मुख्यमंत्र्यांना किती पत्र लिहिली याची माहिती मागवुयात, हा प्रयत्न केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रफुल्ल सारडा यांनी सांगितले.

पण फडणवीस यांच्या २३१ पत्रांच्या आकडेवारीवर शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ रघुनाथ कुचिक यांनी टीका केली आहे. त्यांनी कोरोना काळात राज्याला मदतीची गरज असताना स्वतःला मुख्यमंत्री समजणाऱ्या फडणवीसांनी दोन पत्रे अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना का लिहिली नाहीत ? असा सवाल केला आहे. राज्यात मदतीची गरज असताना केंद्राची मदत मिळाली असती तर कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळाले असते असाही टोला त्यांनी लगावला.

- Advertisement -

शिवसेनेचे म्हणणे काय ?

राज्याचा ३ हजार ३३२ कोटी रूपयांचा जीएसटी राज्य सरकारला येणे बाकी आहे. हे देणे महाराष्ट्राला मिळावे म्हणून केंद्राला पत्र लिहावेसे फडणवीसांना वाटले नाही का ? अर्थमंत्री, पंतप्रधानांना तुम्ही पत्र पाठवली असती तर किमान काही रक्कम राज्याला नक्कीच मिळाली असती. ऑक्सिजन, वेंटिलेटर यासारखी राज्याला मदत गरजेच्या वेळी मिळाली असती. पण तुम्हाला मदत करायची नाही, असेही कुचिक म्हणाले. केवळ मी काही तरी करतो आहे, असो फोटोजेनिक राज्याचा दौरा करत दाखवायचे आहे. मी काही तरी आहे हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रकार आहे, त्याची कीव येते. तुम्हाला मुख्यमंत्री आहे, अशी स्वप्न फडणवीसांना पडायला लागतात. पण मुख्यमंत्री आहात तर पत्र लिहिण्याचे कारण काय ? तुमच्याकडे ताकद आहे, केंद्रात सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्या इतकीच विरोधी पक्षनेता म्हणून आपलीही जबाबदारी आहे, असेही डॉ रघुनाथ कुचिक म्हणाले.


 

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना २३१ पत्र : Devendra Fadnavis wrote 231 letter to cm

राज्याचा ३ हजार ३३२ कोटी रूपयांचा जीएसटी राज्य सरकारला येणे बाकी आहे. हे देणे महाराष्ट्राला मिळावे म्हणून केंद्राला पत्र लिहावेसे फडणवीसांना वाटले नाही का ? अर्थमंत्री, पंतप्रधानांना तुम्ही पत्र पाठवली असती तर किमान काही रक्कम राज्याला नक्कीच मिळाली असती. ऑक्सिजन, वेंटिलेटर यासारखी राज्याला मदत गरजेच्या वेळी मिळाली असती. पण तुम्हाला मदत करायची नाही, फक्त पत्र प्रपंच करायचा आहे. केवळ मी काही तरी करतो आहे, असो फोटोजेनिक राज्याचा दौरा करत दाखवायचे आहे. मी काही तरी आहे हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रकार आहे त्याची मला कीव येते. तुम्हाला मुख्यमंत्री आहे अशी स्वप्न पडायला लागतात, पण मुख्यमंत्री आहात तर पत्र लिहिण्याचे कारण काय ? तुमच्याकडे ताकद आहे, केंद्रात सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्या इतकीच विरोधी पक्षनेता म्हणून आपलीही जबाबदारी आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, October 16, 2021

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -