घरमहाराष्ट्रनागपूर, पिंपरी-चिंचवड पालिकांमधील भ्रष्टाचाराचे पैसे कोणाच्या तिजोरीत जात आहेत?, सामनातून सवाल

नागपूर, पिंपरी-चिंचवड पालिकांमधील भ्रष्टाचाराचे पैसे कोणाच्या तिजोरीत जात आहेत?, सामनातून सवाल

Subscribe

राज्यातील विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप करण्यात आला. या सगळ्यावर शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून काही सवाल उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे. नागपूर महानगरपालिकेत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेतील गैरव्यवहारातील पैसे कोणाच्या तिजोरीत जात आहेत? भाजपशासित राज्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर कोण बोलणार? असा सवाल सामानातून करण्यात आला आहे.

…पण दिव्याखालीच कसा अंधार असतो ते उघड झाले

“महाराष्ट्रात भाजपच्या किरीट सोमय्याने ‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा केले व त्या पैशांचा विनियोग खासगी कामासाठी केला. नागपूर महानगरपालिकेत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेतील गैरव्यवहारातील पैसे कोणाच्या तिजोरीत जात आहेत? कर्नाटक, हरयाणात भाजपची सरकारे आहेत. तेथील भ्रष्टाचारावर कोणी बोलायचे? महाराष्ट्रातील सरकार कसे भ्रष्ट वगैरे आहे यावर भाजपचे स्वतःचे व भाडोत्री भोंगे रोज बोंबलत असतात, पण दिव्याखालीच कसा अंधार असतो ते उघड झाले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

- Advertisement -

हरयाणात भ्रष्टाचार आणि अत्याचाराने टोक गाठलं

शिवसेनेने हरयाणातील भाजप शासित राज्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवत तिथे काय सुरु आहे, यावर भाष्य केलं आहे. “हरयाणात भाजपचे सरकार आहे, तेथे एकाच वेळी भ्रष्टाचार व अत्याचाराने टोक गाठले आहे. हरयाणातील काँग्रेस आमदार नीरज शर्मा यांनी भ्रष्टाचारात आकंठ डुबलेल्या मंत्र्यांवर तसेच अधिकाऱयांवर कारवाई करावी यासाठी जगावेगळी प्रतिज्ञा केली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत तोपर्यंत शिवलेले कपडे व पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा आमदार शर्मा यांनी केली आहे. आमदार शर्मा यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पुराव्यासह समोर आणूनही खट्टर यांचे सरकार कारवाई करायला तयार नाही. जर हजारो कोटींचा भ्रष्टाचार नीरज शर्मा यांनी बाहेर काढला असेल तर या आर्थिक घोटाळय़ाचा तपास ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांनीच हातात घ्यायला हवा. हरयाणातील काँग्रेस आमदारांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा पुकारला आहे. यापासून देशातील इतर विरोधकांनी धडा घ्यायला हवा,” असं आवाहन शिवसेनेने विरोधकांना केलं आहे.

कृपाशंकर यांना ‘ईडी’ने कोपऱ्यात घेऊन दाबलेच होते, पण

“सोमय्याने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व शंभर बोगस पंपन्यांची यादी ‘ईडी’कडे देऊन कारवाईची मागणी केली ते महाशय आज पेंद्रात मंत्री आहेत व दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलत आहेत. हर्षवर्धन पाटलांसारखे लोक बोलतात, ”आम्ही भाजपात गेल्यामुळे शांत झोप लागते. कारण ‘ईडी’ आमच्या मागे लागणार नाही.” कृपाशंकर सिंह यांना ‘ईडी’ने कोपऱ्यात घेऊन दाबलेच होते, पण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना दुधाने धुऊन काढले व आज ते म्हणे साफ झाले आहेत,” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -