घरCORONA UPDATEधक्कादायक! नाशिकमध्ये सापडले 'डेल्टा'चे ३० रुग्ण

धक्कादायक! नाशिकमध्ये सापडले ‘डेल्टा’चे ३० रुग्ण

Subscribe

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, नाशिक शहरात २, तर उर्वरित २८ रुग्ण विविध तालुक्यांतील

नाशिकमध्ये डेल्टा व्हेरियंटचे ३० रुग्ण सापडल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या रुग्णांमध्ये २ रुग्ण  नाशिक शहरातील तर, उर्वरित २८ वेगवेगळ्या तालुक्यांतील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. नाशिकमध्ये निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाला आठवडा उलटत नाही तोच, आता डेल्टाचे संकट आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग मात्र चांगलाच सतर्क झाला आहे.

नाशिकमधून राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेला १५५ नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील ३० नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. ज्या तालुक्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
हा व्हेरिएंट केवळ डेल्टा  आहे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -