घरमहाराष्ट्रयशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या; धारदार शस्त्राने हल्लेखोरांनी केले...

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या; धारदार शस्त्राने हल्लेखोरांनी केले वार

Subscribe

या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अहमदनगरमध्ये त्यांची हत्या करण्यात असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार देखील केले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

असा घडला प्रकार

रेखा जरे या आपला मुलगा आणि आईसोबत सोमवारी पुण्यावरून अहमदनगरला येत होत्या. जतेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटात गाडी ओव्हर टेक करण्यासह गाडीला कट मारल्याचा कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत चर्चा झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हत्येने जिल्ह्यात एकाच खळबळ

रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मात्र नंतर त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली होती. दरम्यान रेखा जरे यांची हत्या नेमकी का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र त्यांच्या हत्येने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


आमचा पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा -शर्मिला ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -