घर उत्तर महाराष्ट्र धक्कादायक आकडेवारी; वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे वर्षाला दीड लाख मृत्यू

धक्कादायक आकडेवारी; वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे वर्षाला दीड लाख मृत्यू

Subscribe

नाशिक : भारतात वर्षाला दीड लाख नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो. एवढे मृत्यू युद्धात देखील होत नाही. या अपघातात कुटुंबातील करता व्यक्ती मृत पावल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. हे सर्व वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होते, अशी माहिती शहर वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे यांनी दिली. नाशिक शहर वाहतूक शाखा युनिट तीनच्या वतीने आदित्य सभागृहात शालेय वाहतूक व्यवस्थापनावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस उपायुक्त खांडवी म्हणाले की, शालेय वाहतूक अपघातात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपल्याला कळते पण वळत नाही. शालेय व्यवस्थापनाने यासंदर्भात पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळेच्या बाहेर वाहन उभे न करता शाळांनी त्यांना मैदान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सिडकोतील शाळे बाहेर वाहनांची गर्दीचे मोठे प्रमाण आहे. त्याकरता शालेय समितीने बैठकित शहर वाहतूक पोलिसांची मदत घेऊन घेणे आवश्यक आहे. त्याकरता शहर पोलीस नक्कीच मदत करतील सध्या ऑनलाईन पद्धतीने पोलीस मित्रांची नोंदणी केली जात आहे. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांना सामावून घेण्यात येणार आहे. नागरिकांना प्रत्यक्ष सूचना करणे अवघड जात असेल तर त्यांनी ८२६३९९८०६२ या व्हाट्सअ‍ॅप नंबरवर करून सूचना अथवा आपले मत मांडावे. यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच ११२ ला फोन करून मदत घ्यावी. पोलीस दहा मिनिटात पोहोचून मग करतील, असे वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.

- Advertisement -

या कार्यशाळेप्रसंगी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बारी, पोलीस निरीक्षक पराग जाधव, सिडको मनपा विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे, माजी नगरसेवक देवानंद बिरारी, भगवान दोंदे, प्रतिभा पाटील ,पुष्पा आव्हाड अमोल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, कर्मचारी, शालेय वाहतूक करणारे चालक-वाहक आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी सूत्रसंचलन केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -