धक्कादायक! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश

nanded crime girls commits suicide in nanded due to harresment by villages youth

पुणे – सामूहिक आत्महत्यामुळे पुणे शहरात खळबळ माजली आहे. शेअर बाजारात आर्थिक नुकसान झाल्यामुळे एका कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घडना घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दिपक थोटे ( वय- 59) इंदू दिपक थोटे ( वय- 45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय- 24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय-17) अशी मृतांची नावे आहेत.

पुण्यातील मुंढवा परिसरात दिपक थोटे यांचे कुटुंब राहते. पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा संसार होता. ते मुळचे अमरावतीचे असून दोन महिन्यांपूर्वी ते केशवनगर येथे वास्तव्यास आले. मात्र, आर्थिक नुकसानीतून या चौघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे.

शेजारी राहणारे डॉ.दौलत पोटे यांना थोटे यांच्या घराचा दरवाजा बंदच असल्याने संशय आला. त्यांनी याबाबत केशवनगर पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी तातडीने धाव घेत दरवाजा तोडला. त्यांना चौघांचे मृतदेह येथे सापडले. चौघांचेही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीकरता ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, शेअर बाजारात आर्थिक नुकसान झाल्याने ही सामूहिक आत्महत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.