घरमहाराष्ट्रमुंबईत भ्रष्टाचाराच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, कंत्राटदाराची भाषा...

मुंबईत भ्रष्टाचाराच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, कंत्राटदाराची भाषा…

Subscribe

श्रीकांत शिंदे म्हणाले की, आदित्य ठाकरे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याची टीका केली आहे. तसेच, ते कंत्राटदारांची भाषा करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. ते मंगळवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रस्ते बांधकामात मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता या घोटाळ्याच्या आरोपांवरुन शिवसेना (खासदार) श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की, आदित्य ठाकरे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याची टीका केली आहे. तसेच, ते कंत्राटदारांची भाषा करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. ते मंगळवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. ( Shrikant Shinde hits back at Aditya Thackeray on corruption charges in Mumbai )

नेमकं श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

श्रीकांत शिंदे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक कंत्राटदाराची भाषा करत आहेत. सामान्य पुढारी अशा वार्ता करत नसतो. त्यांना बरोबर दर माहिती आहे, कंत्राटदाराची भाषा माहिती आहे. ते 25 वर्षे तेच काम करत आले आहेत.

- Advertisement -

तसचं, यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जयंत पाटलांवरही टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस 2024 मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल. त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की, इथं प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. लोक रात्री स्वप्न पाहतात. मात्र काही लोक आता दिवसाही स्वप्न पाहतात. त्यामुळे इतरांच्या स्वप्नावर आम्ही काहीही बोलू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयात सत्याचा निकाल लागेल

निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने लागला आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातही सत्याच्या बाजूने निकाल लागेल. आम्हाली सर्वोच्च न्यायालयाची धास्ती वगैरे काहीही नाही. तांत्रिकदृष्ट्या ज्या गोष्टी करायला हव्या त्या आम्ही तंतोतंत बरोबर केल्या आहेत. तसंच, आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असं मत श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचा आरोप काय? 

शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावरुन पुन्हा एकदा शिंदे सरकरावर आरोप केला आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) २०२१-२२ पासून रस्त्यांची कामे सुरु आहेत. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लहरीपणामुळे मुंबई पालिकेन अचानक निर्णय घेतला की मुंबईतील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे टप्प्याटप्प्यांऐवजी एका निविदेद्वारेच काँक्रिटीकरण केले जाईल. यावर ठाकरेंनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, जागतिक स्तरावर कोणत्याही शहरात रुंदी आणि गरजेनुसार रस्त्यांचे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण केले जाते, हे कधीही एकसारखे किंवा ठोस नसते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या लहरीपणामुळे ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -