घरताज्या घडामोडीरिपाइंच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सिद्धार्थ कासारे यांची नियुक्ती

रिपाइंच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सिद्धार्थ कासारे यांची नियुक्ती

Subscribe

रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सिद्धार्थ कासारे यांची आज निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कासारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पक्षाच्यामुंबई कार्याध्यक्षपदी बाळासाहेब गरुड, सरचिटणीसपदी विवेक गोविंदराव पवार आणि कोषाध्यक्षपदी सुनील बन्सी मोरे यांची नियुक्ती केली.

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्या मुंबई विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार युवक आघाडीच्या अध्यक्षपदी रमेश गायकवाड, झोपडपट्टी महासंघ महाराष्ट्र अध्यक्षपदी सुमीत वजाळे, राज्य समितीच्या उपाध्यक्षपदी प्रकाश मोरे तर राज्य सचिवपदी हरिहर यादव यांची निवड केली गेली.

- Advertisement -

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू कागदे आदी उपस्थित होते.


हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, पालिकेच्या निवडणुकांबाबत रणनिती ठरण्याची शक्यता

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -