घरताज्या घडामोडीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, पालिकेच्या निवडणुकांबाबत रणनिती ठरण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, पालिकेच्या निवडणुकांबाबत रणनिती ठरण्याची शक्यता

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असून सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन देखील ते घेणार आहेत. अमित शाह आज रात्री 9.30 वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेत गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच शाह हे मुंबई दौऱ्यावर असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईचं अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं आहे. आगामी महापालिका निवडणूक, वार्डरचना आणि कॅबिनेट विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शाह मुंबई दौऱ्यात बीएमसी निवडणुकीसाठी काय रणनिती आखणार किंवा त्यासाठी भाजप नेत्यांना कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या वर्षाच्या अखेरीस राज्यात पालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपानेही निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, अमित शहांचा दौरा झाल्यानंतर डिसेंबरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा मुंबई दौऱ्यावर यण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गणेशोत्सवाच्या धामधुमीत अमित शहा येणार मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -