घरताज्या घडामोडीTemperature Increased : उन्हाचा तडाका; नागपुरात 'या' वेळेत सिग्नल राहणार बंद

Temperature Increased : उन्हाचा तडाका; नागपुरात ‘या’ वेळेत सिग्नल राहणार बंद

Subscribe

राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या तापामानामुळे नागरिकांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागपुरात आता दुपारच्या वेळेच सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या तापामानामुळे नागरिकांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागपुरात आता दुपारच्या वेळेच सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय आज घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना तसेच वाहतूक पोलिसांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सिग्नलवर थांबून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. नागपूर शहरातील वाढत तापमान लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी 21 चौकांमधील सिग्नल हे दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

दुपारच्या वेळी ज्या याठिकाणी फारशी गर्दी नसते आणि सिग्नल बंद असले तरी वाहतूक कोंडी होणार नाही असे 21 सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे. यामध्ये काचीपुरा, बजाज नगर, लक्ष्मी नगर, माता कचेरी, कन्नमवार चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, सायन्स कॉलेज चौक, अहिंसा चौक, आग्याराम देवी चौक, सरदार पटेल चौक, वैद्यनाथ चौक, मनपा झोन 4 ऑफिस, नरेंद्रनगर, कडबी चौक,10 नंबर पुलिया, भीम चौक, जपानी गार्डन, पोलीस तलाव, राठोड लॉन चौकवरील सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे.

तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. केवळ नागपूर आणि विदर्भातचं नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा वर चढलेला दिसून येत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान हे 40 अंशाच्या वर पोहोचले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शॉक लागून महानगर गॅस कंत्राटी कर्मचारी जखमी; चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -