घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिन्नरची ऐतिहासिक मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर; प्राशासनिक उदासीनतेमुळे ठेवा होणार नष्ट?

सिन्नरची ऐतिहासिक मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर; प्राशासनिक उदासीनतेमुळे ठेवा होणार नष्ट?

Subscribe

नाशिक : पौराणिक, प्राचीन व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सिन्नर शहरासह तालुक्यात विविध देवदेवतांची लहान-मोठी अनेक मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या मंदिरांची डागडुजी करुन सिन्नरची समृद्धी जतन करावी अशी मागणी पुढे आली आहे.

मंदिराचे ऐतिहासिक गाव अशी ओळख असल्याने सिन्नरला प्राचीन काळातही महत्त्व असल्याचे पुराणात आढळते. अनेक ग्रंथांमध्ये सिन्नरचा उल्लेख आढळतो. नाशिक जिल्हा तीर्थक्षेत्र असल्यामुळे प्राचीन मंदिरे असलेली अनेक गावे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झालीत व त्या गावांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला. सिन्नरला मात्र तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला नाही. अनेक जुने मंदिर हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गाव ऐतिहासिक मंदिरांच्या विकासात मागे पडले आहे. पण काही मंदिरांचे जीर्णोद्धार सिन्नर शहरातील तसेच तालुक्यातील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येत नव्या मंदिरात केलेला आहे.

- Advertisement -

तसेच त्या मंदिरांचा कारभार त्या व्यक्ती पाहत आहेत, अशी सर्व मंदिरे सुस्थितीत आहेत. मात्र, अद्यापही अशी काही मंदिरे आहेत जी पूर्णतः दुर्लक्षित आहेत. त्यांची पडझड होत आहे. स्थानिक प्रशासनाने लक्ष न दिल्यास अशी मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील हेमाडपंती असलेले मुक्तेश्वर मंदिर, ऐश्वर्य मंदिर, पूर्व भागातील अनेक गावात ऐतिहासिक मंदिरांची पडझड झाली आहे. त्यात अनेक गावात पुरातन मंदिराची पडझड झाली असून त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी या मंदिरांची अजूनही स्वच्छता तसेच साफसफाई ठेवली असून मंदिर जरी छोटे असले तरी तो एक ऐतिहासिक ठेवा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. लवकरात लवकर संबंधित विभागाने तालुक्यातील या छोट्या-मोठ्या मंदिरांचे घुमट, भिंत, दगड यांची डागडूजी करून त्या मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून द्यावेअशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -