घरमहाराष्ट्रकृषी संस्कृतीचा कलाविष्कार घडवणारा शिलेदार हरपला

कृषी संस्कृतीचा कलाविष्कार घडवणारा शिलेदार हरपला

Subscribe

जीव्या सोमा मसे यांना केवळ आदिवासी वारली चित्रकार म्हणून ओळखले जाते. मात्र, एवढीच या कलाकाराची ओळख कधीच नव्हती. सिंधू संस्कृती किंवा शेतीचा शोध लागल्यापासून कृषी संस्कृतीची ओळख ज्या चित्रांच्या माध्यमांतून कलाजगत किंवा सामान्य माणसांना झाली, त्या चित्रसंस्कृतीचे महत्त्वाचे किंबहुना एकमेव शिलेदार अशीच जीव्या सोमा मसे यांची ओळख सांगावी लागेल. त्यामुळे त्यांना केवळ आदिवासी चित्रकार म्हणणे हे त्यांच्यावर आणि त्यांच्या कलेवरही अन्याय करणारे ठरेल, असे सर जे.जे. कला महाविद्यालयातील चित्रकलेचे प्राध्यापक आणि चित्रकलेचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर यादव सर यांनी सांगितले.

यावेळी प्रा. यादव यांनी मशे यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण आणि कलाक्षेतील आठवणी सांगितल्या. सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ज्यावेळी नाव सुचवण्याविषयी मला विचारणा केली त्यावेळी मी तात्काळ जीव्या सोमा मशे यांचे नाव सुचवले. त्यावेळी संबंधित सरकारच्या प्रतिनिधींना जीव्या सोमा मशे यांच्या वारली आणि ग्रामीण तसेच कृषी संस्कृतीतील या दुर्लक्षित राहिलेल्या योगदानाची पुरेशी माहिती नव्हती याबाबत मला खंत वाटली. मी ही माहिती त्यांना दिली. त्यानंतर माझे आणि म्हसेतील मैत्रीपूर्ण संबंध वाढत गेले.

- Advertisement -

आधुनिक आणि ग्रामीण, प्राचीन आणि कृषी चित्रकला अशा चित्रकलेच्या अनेकविध प्रकारांबाबत आमची चर्चा होत असे. मानवी संस्कृतीतील सर्वात जुनी शेती परंपरा आणि त्याचे चित्रण त्याच परंपरेतून अगदी सहजतेने करणारा कलाकार म्हणजे जीव्या सोमा मशे होते. त्यांच्या जाण्याचे दुःख असले तरी त्यांचे जाणे हे त्यांच्या कलेप्रमाणेच सहज होते. निसर्गनियमानुसार होते याचे समाधान आहे. मात्र, एक चांगला मित्र आणि प्रतिभावंत कलाकार हरपल्याचे दुःख आहे, अशा भावना प्रा. यादव यांनी ‘महानगरशी बोलताना व्यक्त केल्या.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -