सोमय्या, थोडं भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांबाबतही बोला – आमदार नाईक

'तो' बंगला प्रशासनाने नव्हे मालकानेच तोडला

MLA Vaibhav Naik

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील अलिशान बंगल्यावर हातोडा चालवत संपूर्ण बांधकाम तोडण्यात आले. नार्वेकर यांचा बंगला जमीनदोस्त झाला असून, आता पुढचा नंबर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला. त्यावरुन आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्या आणि राणेंना लक्ष्य करत भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांकडेही जरा लक्ष द्या, असा सल्ला दिलाय.

दोपोलीचा हा बंगला प्रशासनाने नव्हे तर स्थानिक बंगला मालकानेच स्वतःहून तोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा बंगला तोडायचा असल्यास प्रशासनाकडून आधी पूर्वसूचना देणारी नोटीस दिली जाते. मात्र, अशी कोणतीही नोटीस या बंगल्याला मिळालेली नाही. CRZ कायद्याचं उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक बंगला मालकाने स्वत:हूनच हा बंगला तोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात दापोली तालुका तहसील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही अशा प्रकारे कोणतीही नोटीस बंगल्याला बजावली नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

हेही वाचा-  मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त; सोमय्या म्हणतात पुढचा नंबर कोणाचा?