घरCORONA UPDATEसप्टेंबरमध्ये दिवसाला ४ ते ५ लाख कोरोनाबाधितांची शक्यता, निती आयोगाच्या जाणून घ्या...

सप्टेंबरमध्ये दिवसाला ४ ते ५ लाख कोरोनाबाधितांची शक्यता, निती आयोगाच्या जाणून घ्या सूचना

Subscribe

आतापासूनच २ लाख (ICU BED) आयसीयू बेडची व्यवस्था करुन ठेवावी.

कोरोनाच्या विरोधात लढाई अधिक तीव्र करण्यात आली असून देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने करण्यात येत आहे. सध्या राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र देशातील तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम असल्याची शक्यता वर्तवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वबूमीवर आरोग्य विभागाला एकूण २ लाख आयसीयू बेड सज्ज ठेवण्याचे आवाहन केलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सप्टेंबरम २०२१ मध्ये आहे. यामुळे सप्टेंबरमध्ये दिवसाला ४ ते ५ लाख कोरोनाबाधितांची नोंद होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून निती आयोगाने काही सूचना जारी केल्या आहेत.

देशातील तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे तीव्र पडसाड उमटणार असल्याची शक्यता वर्तवली होती. निती आयोगाने म्हटलं आहे की, सप्टेंबरमध्ये एका दिवसाला ४ ते ५ लाख कोरोना रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच २ लाख (ICU BED) आयसीयू बेडची व्यवस्था करुन ठेवावी.

- Advertisement -

निती आयोगाने यापुर्वीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत इशारा दिला होता. गंभीर, मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी एकूण २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडू शकते अशी शक्यता होती. मात्र आता निती आयोगाने दिलेल्या सुचनेमध्ये याचं प्रमाण अधिक होण्याची शक्यता आहे.

निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी कोरोना प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी मागील महिन्यात केंद्र सरकारला काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यांनी म्हटलं होते की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमद्ये १०० रुग्णांमधील सर्वच १०० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते.

- Advertisement -

दिवसाला ४ ते ५ लाख रुग्ण

निती आयोगाने दिलेल्या सूचनांमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोना विरोधातील लढाईत सतर्क राहणे गरजेचे आहे. पुढच्या महिन्यात दिवसाला ४ ते ५ लाख रुग्णांची नोंद होण्याची शक्यात आहे. यामुळे आतापासूनच सप्टेंबरपर्यंत २ लाख आयसीयू बेडची तयारी सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेडची आवश्यकता आहे. तर ७ लाख नॉन आयसीयू रुग्णालयात ५ लाख ऑक्सीजनसहीत बेडची गरज भासणार आहे. तर १० लाख कोरोना आइसोलेशन केयर बेडची गरज असल्याच्या सूचना निती आयोगाने दिल्या आहेत.

निती आयोगाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेवरुन सांगितली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये १० राज्यात २१.७४ टक्के प्रकरणांची नोंद झाली होती. यामध्ये २.२ टक्के रुग्णांना आयसीयू बेडची गरज भासली होती.


हेही वाचा :  …अन्यथा पुन्हा पूर्ण लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -