घरताज्या घडामोडीपुणेकरांनो आता तरी नियम पाळा; क्वारंटाईन रूग्ण बेपत्ता!

पुणेकरांनो आता तरी नियम पाळा; क्वारंटाईन रूग्ण बेपत्ता!

Subscribe

परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र त्यातले काही जण अचानक बेपत्ता झाल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. करोना व्हायरस हा व्हायरस परदेशातून भारतात आला. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या भारतीयांची कसून तपासणी केली जाऊ लागली. परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. तसंच करोनाचा फैलाव वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र त्यातले काही जण अचानक बेपत्ता झाल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सांगूनही नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. मुंबई, पुण्यात परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र त्यातले काही जण अचानक बेपत्ता झाले आहेत. सध्या पोलिसांचे या व्यक्तींचा शोध घेत आहेत. असे असूनही अनेक जण रेल्वेने, बसने शहरातच नव्हे तर गावाकडे जाताना आढळत आहेत. हे प्रवासी अन्य कुणाच्या संपर्कात आल्यास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने त्यांनी घरातच राहणे अपेक्षित आहे. मात्र हातावर विलगीकरणाचा शिक्का मारण्यात आलेले बाहेर फिरत आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी क्वारंटाईन रूग्णांना हजर राहण्याचे आवाहन केले आहे. जर हे बेपत्ता असणारे लोक हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती दिसली तर आम्हाला १८००२३३४१३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.

महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Coronavirus – मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र बंद!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -