घरताज्या घडामोडीनागपाड्यातून आंदोलक महिलांचा घरी परतण्याचा निर्णय!

नागपाड्यातून आंदोलक महिलांचा घरी परतण्याचा निर्णय!

Subscribe

करोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर नागपाड्यातील आंदोलक महिलांनी आंदोलक स्थळावरून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागेच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाग म्हणून पुढे आलेल्या नागपाड्यामध्ये गेल्या दीड महिन्याहून जास्त काळ मोठ्या संख्येने महिला आंदोलनाला बसल्या होत्या. जोपर्यंत सीएए आणि एनआरसी रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या महिलांनी घेतली होती. मात्र, राज्यात आणि एकूणच देशभरात होत असलेल्या करोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर नागपाड्यातल्या आंदोलक महिलांनी आंदोलन स्थळावरून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे आंदोलन बंद किंवा स्थगित झालं नसून फक्त प्रत्यक्ष उपस्थितीपासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेलं आहे, अशी भूमिका आंदोलनकर्त्या महिलांनी मांडली आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित होण्याच्या आधीपासून दिल्लीच्या शाहीनबागमध्ये, मुंबईच्या नागपाड्यामध्ये आणि देशभरात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने महिला आंदोलक जमा होऊन आंदोलन करत आहेत. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील हळूहळू करोनाचा फैलाव होऊ लागला आहे. देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक ८९ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातही सर्वाधिक २४ रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे, हातपाय पसरत असलेला करोना व्हायरस आणि लागू करण्यात आलेली जमावबंदी, या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळावरून घरी परतण्याचा निर्णय इथल्या आंदोलक महिलांनी घेतला आहे.

- Advertisement -

डिजिटल प्लॅटफॉर्मवर आंदोलन सुरू राहणार

दरम्यान, आम्ही जरी आंदोलन स्थळावरून घरी परतत असलो, तरी हे आंदोलन स्थगित किंवा बंद झालेलं नाही, अशी भूमिका या महिलांनी घेतली आहे. ‘माणुसकी म्हणून आम्ही हे आंदोलन आता मैदानावरून डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन जात आहोत. हे स्थगित देखील झालेलं नाही आणि बंद देखील झालेलं नाही’, अशी प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -